amarjit pawar celebrate win | रविवारी राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतीच्या निवणूका झाल्या आहेत. आज त्या निवडणूकांच निकाल लागत आहे. या निवडणूकीसाठी कितीतरी महिन्याआधीच कार्यकर्ते कामाला लागले असतात. आपला नेता निवडून येण्यासाठी कार्यकर्ते पार जीवाचं रान करताना दिसून येतात.
काही कार्यकर्ते आपल्या नेत्याला निवडून देण्यासाठी दिवसरात्र प्रचार करतात, तर काही कार्यकर्ते हे नवसही करतात. आता पंढरपुरामध्ये एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. याठिकाणी एका पतीने पत्नी आणि पक्ष जिंकावा यासाठी एक खास नवस केला होता.
आता पत्नी जिंकल्यानंतर त्याने तो नवस फेडला आहे. पंढरपुरातील आजोती ग्रामपंचातीवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे. अमरजित पवार या व्यक्तीन राष्ट्रवादी काँग्रेसचा सरपंच झाल्याशिवाय दाढी आणि केस कापणार नाही, असा नवस केला होता. आता राष्ट्रवादीचा आमदार झाल्यानंतर त्यांनी तो नवस फेडला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून अमरजित यांनी दाढी केली नव्हती. आज अमरजित पवार यांच्या पत्नीचा ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत विजय झाल्यानंरत त्यांनी पुष्पा स्टाईलने सेलिब्रेशन केले आहे. पत्नीने निवडणूक जिंकली याचाही आनंद त्यांना झाला असून ते खुप आनंदी आहे.
निवडणूकीत लोकांना पिण्याचं पाणी, चांगले रस्ते, सांडपाण्याची योग्य सोय या सर्व सोईसुविधा देईल, असे वचन दिले होते. तसेच गावकऱ्यांनी निवडून दिलं तर माझे केस आणि दाढी तिरुपतीच्या चरणी अर्पण करेल, असा नवस मी केला होता. आता त्यांनी निवडून दिल्यानंतर मी नवस फेडणार आहे, असे अमरजित पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी केस कापले नव्हते, तसेच दाढीही केली नव्हती. राष्ट्रवादीचा सरपंच झाल्याशिवाय आपण केस कापणार नाही आणि दाढी कऱणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. आता त्यांची पत्नी आरती पवार यांचा ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत विजय झाला आहे. त्यामुळे ते आता केस आणि दाढी अर्पण करण्यासाठी तिरुपतीला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
ncp : भाजपच्या गडात राष्ट्रवादीचा धुमाकूळ; ठाकरेंना धोका दिलेल्या खासदाराचा तर सुपडा साफ, एकाही जागी यश नाही
NCP : राष्ट्रवादीचा ठाकरेंच्या शिवसेनेला धोका; शिंदे गटातील बड्या मंत्र्याच्या मुलीला बनवलं सरपंच
shahrukh khan : शाहरुख खानची झालीय खूपच बिकट अवस्था; देतोय ‘या’ गंभीर आजाराशी झुंज…






