Share

बारामतीचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी दिल्लीतून नियोजन, भाजपने आखला ‘हा’ खास प्लॅन

sharad pawar

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच भाजप जोमाने कामाला लागली आहे. राज्यातील भाजप नेत्यांसोबतच अनेक केंद्रीयमंत्र्यांनी देखील राज्यात प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले आहे. विशेष बाब म्हणजे, भाजपने आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामतीवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत बारामतीचा कार्यक्रम हुकला. मात्र, आता पुढील लोकसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करू, असा निर्धार भाजपकडून व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे आता आगामी निवडणूक बारामती कोणाच्या ताब्यात जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण बारामतीच्या दौऱ्यावर येणार असल्याच बोललं जातं आहे. या दौऱ्यावरुन भाजप 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशातच भाजप नेते राम शिंदे यांनी एक मोठं व्यक्तव्य केलं आहे.

माध्यमांशी बोलताना निर्मला सीतारमण यांच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी इंदापूरच्या अर्बन बँकेच्या सभागृहात प्रभारी राम शिंदे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या स्थानिक नेत्यांची बैठक पार पडली. “2019 ला बारामतीचा कार्यक्रम हुकला. तो 2024 ला करायचा आहे”, असं विधान राम शिंदे यांनी केलं आहे.

बोलताना राम शिंदे यांनी म्हंटलं आहे की, “A म्हटलं की अमेठी B म्हटलं की बारामती. A चा कार्यक्रम 2019 लाच केला. 2019 ला बारामतीचा कार्यक्रम हुकला. तो 2024 ला करायचा आहे. त्याच्यासाठीच 17 महिने अगोदरच हे नियोजन सुरू आहे. आणि हे नियोजन असे तसे नसून देशाच्या अर्थमंत्री येणार आहे.’

दरम्यान, दिवस बदलतात, पावसाळा झाला की हिवाळा येतो, आपल्याला उन्हाळा होता आता पावसाळा आला आहे. वातावरणात बदल होत असतो. परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही, असे सूचक व्यक्तव्य देखील राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केलं आहे.

याचबरोबर मिळालेल्या माहितीनुसार, निर्मला सीतारामन तीन दिवसीय बारामती दौऱ्यावर असणार आहेत. २२ ते २४ सप्टेंबर दरम्यान त्या बारामती लोकसभा मतदारसंघाची पाहणी करतील, नवी व्यूव्हरचना आखतील, अशी माहिती सध्या मिळत आहे. सध्या निर्मला सीतारामन यांच्या बारामती दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि एकनाथ गटात जुंपली! आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना झाप – झाप झापले, वाचा काय म्हंटलंय?
आदित्य ठाकरेंनी मातोश्रीवरील १०० खोक्यांबाबत खुलासा करावा; रामदास कदमांनी केली पोलखोल
फडणवीसांची भेट घेतल्यानंतर अशोक चव्हाण थेट दिल्ली दरबारी; कॉंग्रेसच्या गोटात खळबळ, राजकीय समीकरण बदलणार
थेट मुळावरच घाव! उद्धव ठाकरेंचा सर्वात जवळचा माणूस फुटणार? शिंदेंनी घरी जाऊन घेतली भेट

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now