shivsena : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आमदार, खासदारांची शिवसेनेतून गळती सुरू झाली. मोठ्या प्रमाणात आमदार, खासदार, पदाधिकारी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. एकावर एक असे मोठे धक्के त्यामुळे उद्धव ठाकरेंना बसत राहिले. आता दसरा मेळावा तोंडावर असतानाच शिवसेनेला मोठा धक्का बसणार असल्याचे संकेत शिंदे गटाकडून दिले जात आहेत.
शिवसेनेचे शिंदे गटात सामील झालेले खासदार प्रतापराव जाधव यांनी एका कार्यक्रमात बोलताना याबाबत भाष्य केले. ते म्हणाले, शिवसेनेतील उरलेल्या आमदारांपैकी चार आमदार आणि तीन खासदार लवकरच शिंदे गटात सामील होणार आहेत. असा दावा जाधवांकडून करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
तसेच उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळ जवळचे मानले जाणारे नार्वेकर शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती. त्याबाबत बोलताना जाधव म्हणाले, नार्वेकरच नव्हे तर तीन खासदारही लवकरच शिंदे गटात येणार आहेत. खासदार जाधव यांनी केलेल्या दाव्यात किती तथ्य आहे, हे सांगता येत नाही. मात्र शिवसेनेला मोठा हादरा बसवणारा हा धक्का ठरू शकतो.
राजकीय वर्तुळात मात्र शिवसेनेचे सचिव आणि उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळ असणारे नार्वेकर लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार, अशी चर्चा सुरू आहे. गणेशोत्सवा दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नार्वेकरांच्या घरी जात त्यांच्या बाप्पाचे दर्शन घेतले होते. त्यावेळी देखील याबाबत चांगली चर्चा झाली. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या सहाय्यक पदावर म्हात्रे यांची नियुक्ती झाल्याचे बोलले जात असल्याने या चर्चेला अधिक बळ मिळाले.
एकनाथ शिंदे गटाने पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह त्यांना मिळण्याबाबत निवडणूक आयोगात अर्ज केला होता. सर्वोच्च न्यायालयानेही निवडणूक आयोगाला तो अधिकार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आधीच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे समर्थकांची धाकधूक वाढली होती. त्यामध्ये आता शिवसेनेतील काही आमदार, खासदार शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू असल्याने उद्धव ठाकरेंच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.
मात्र प्रतापराव जाधव यांनी जो दावा केला. त्याबाबत आता शिवसेनेकडून कोणती प्रतिक्रिया येते? हे तर पहावे लागेल. भविष्यकाळात कोणता आमदार, खासदार शिंदे गटात जातोय? हे येत्या काळात समोर येईल. मात्र सध्या तरी प्रतापराव जाधव यांनी केलेल्या खळबळजनक वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याचे पडसाद दसरा मेळाव्यात उमटणार हे नक्की.
महत्वाच्या बातम्या-
Ajit pawar :‘पक्ष कमकुवत झालाय, पार्थ पवारांकडे नेतृत्व द्या’ अशी मागणी कार्यकर्त्यांनी करताच अजितदादांनी झापले, म्हणाले…
shivsena : शिवसैनिकाने रक्ताने पत्र लिहीत दाखवली निष्ठा ; अन् नंतर उद्धव ठाकरेंनी दिला सुखद धक्का, वाचा नेमकं काय घडलं?
rohit pawar : अमोल कोल्हे शहांच्या भेटीला तर पवारांचा ‘जय श्रीराम ‘चा नारा; वाचा नेमकं राष्ट्रवादीत घडतंय काय?