Share

Video: अल्लू अर्जुनची पत्नी गोवाच्या बीचवर करतीये धमाल, सोशल मिडीयावर व्हिडिओ झाले व्हायरल

allu arjun wife sneha reddy

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जून ‘पुष्पा’ या चित्रपटामुळे सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली. चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अल्लू अर्जूनच्या लोकप्रियतेत अधिक भर पडली आहे. तसेच त्याच्यासंबंधित प्रत्येक बातमी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यादरम्यान आता अल्लू अर्जूनची पत्नी स्नेहा रेड्डीचे (allu arjun wife sneha reddy) व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

अल्लू अर्जून नुकतीच त्याची पत्नी आणि मुलांसोबत गोव्यावरून घरी परतला आहे. मात्र, अल्लू अर्जूनची पत्नी स्नेहा रेड्डी अजूनही गोव्याच्या प्रेमात असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर ती सतत गोव्याच्या व्हेकेशनदरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे. यामध्ये स्नेहा तिचा पती अल्लू अर्जून आणि तिच्या मित्रांसोबत गोवा व्हॅकेशनदरम्यान खूपच एन्जॉय केल्याचे दिसत आहे.

स्नेहा रेड्डीने शेअर केलेल्या एका व्हिडिओत तिने गोवा व्हॅकेशनदरम्यानचे अनेक फोटो एकत्र करून व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओतील फोटोंमध्ये ती पती आणि मित्रांसोबत पोझ देताना दिसून येत आहे. तसेच दुसऱ्या एका व्हिडिओत ती बीचवर एन्जॉय करताना दिसत आहे. सध्या तिचे हे व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

दरम्यान, अल्लू अर्जून सिनेसृष्टीतील प्रसिद्ध घराण्यातील मुलगा आहे. त्याचे आजोबा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध विनोदी कलाकार होते. तर अल्लू अर्जूनचे वडिल अल्लू अरविंद मोठे निर्माता आहेत. तसेच साऊथ मेगास्टार चिरंजीवी यांचा तो भाचा आहे. मात्र, आपल्या मेहनतीच्या जोरावर अल्लू अर्जूनने सिनेसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज अल्लू अर्जून लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.

अल्लू अर्जूनने ‘गंगोत्री’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. मात्र, ‘आर्या’ या चित्रपटामुळे त्याला फार लोकप्रियता मिळाली. तेलुगूसोबत त्याची हिंदीतही फार क्रेझ आहे. हिंदीत डब केलेले त्याचे अनेक चित्रपट टीव्हीवर खूप पाहिले जातात. तर आता त्याचा ‘पुष्पा’ हा चित्रपट तेलुगूसह तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदीत भाषेत प्रदर्शित झाला. त्यामुळे त्याच्या हिंदी चाहत्यांची अल्लू अर्जूनला मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा पूर्ण झाली.

दरम्यान, अल्लू अर्जूनने ६ मार्च २०११ रोजी स्नेहा रेड्डीसोबत लग्न केले. त्यानंतर ३ एप्रिल २०१४ रोजी त्यांचा पहिला मुलगा अयानचा जन्म झाला. त्यानंतर दोन वर्षांनी २०१६ मध्ये मुलगी अरहाचा जन्म झाला. स्नेहा आणि अर्जून नेहमी त्यांच्या मुलांसोबत वेळ घालवताना दिसून येतात. तसेच अनेकदा ते त्यांच्या मुलांचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळत असते.

महत्त्वाच्या बातम्या :
‘पुष्पा’मध्ये ‘झुकेगा नहीं’ म्हणत दाढीखालून हात फिरवण्याची कल्पना कशी सुचली होती? अल्लू अर्जुनने केला खुलासा
कार्तिक आर्यनच्या धमकीमुळे रिलीज होऊ शकला नाही ‘अला वैकुंठपुरमलो’चा हिंदी व्हर्जन? निर्मात्याचा खळबळजनक खुलासा
पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुनप्रमाणे करत होते लाल चंदनाची तस्करी, ५५ मजुरांसह ३ मोठ्या तस्करांना अटक

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now