मुंबई। साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनने ‘पुष्पा’ चित्रपटातून लाखो लोकांचे मन जिंकले. या चित्रपटाने आतापर्यंतचे अनेक रेकॉर्ड मोडीस काढले. तसेच अनेक विक्रमी रेकॉर्ड तयार केले. या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मीका मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटानंतर त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. पुष्पा चित्रपटाच्या यशानंतर चाहत्यांनी रश्मीकाला आणि अल्लू अर्जुनला चांगलेच उचलून धरले आहे.
पुष्पा चित्रपटाच्या यशानंतर अल्लू अर्जुन आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. तसेच त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अल्लू अर्जुन आपल्या लक्झरी कारने प्रवास करत होता. यावेळी अल्लू अर्जुनाच्या कारच्या खिडक्या या काळ्या रंगाच्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी त्याला अडवले.
एवढेच नाही तर अल्लू अर्जुनने ट्राफिकच्या नियमांचे देखील उल्लंघन केले. त्यामुळे पोलिसांनी त्याला हैद्राबाद मधील बिझी सेंटरजवळ अडवले आणि कडक कारवाई केली. तसेच त्याच्याकडून ७०० रुपयांचा दंड देखील वसूल केला. अल्लू अर्जुनच नाही तर असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी ट्राफिकच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना दंड भरावा लागला.
दरम्यान, सोशल मीडियावर पुष्पा चित्रपटाचा क्रेझ आजही पहायला मिळतो. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या तोंडात आज पुष्पा चित्रपटातील डायलॉग आहे. ‘फ्लॉवर नहीं फायर है’, ‘झुकेगा नहीं साला’ हे डायलॉग आज प्रत्येकाच्या तोंडी आहेत. तसेच इंस्टाग्रामवर या चित्रपटातील गाण्यांचे, डायलॉगचे रिल्स पहायला मिळतील.
पुष्पाच्या कोट्यावधींच्या कामाईनंतर पुष्पा-२ ची तयारी मोठ्या प्रमाणात होतांना दिसत आहे. तसेच चाहत्यांचा या चित्रपटाच्या बाबतीतील क्रेझ वाढत चालला आहे. तसेच अनेक प्रोडक्शन हाऊस मध्ये मोठी स्पर्धा लागली आहे. पुष्पा प्रमाणे पुष्पा-२ देखील प्रेक्षकांना आकर्षित करेल का? पुष्पाचे रेकॉर्ड मोडून नवीन रेकॉर्ड तयार करेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
बिग बॉसच्या चाहत्यांना धक्का! ‘या’ प्रसिद्ध कपलचा झाला ब्रेकअप, पोस्ट शेअर करत दिली माहिती
१२१ वर्षांपुर्वी ज्या KGF मध्ये ९०० टन सोनं मिळालं होतं तिची रक्तरंजित कहाणी वाचून थरकाप उडेल
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेला वेगळे वळण, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची होणार एन्ट्री, नाव वाचून व्हाल अवाक