Pushpa 2, Allu Arjun, Rashmika Mandanna/ साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला. चित्रपटाने चमकदार कामगिरी केली आणि खूप प्रशंसा मिळवली. चित्रपटाच्या कथेसोबतच त्याच्या गाण्यांच्या हुक स्टेप्स जगभर प्रसिद्ध झाल्या. यासोबतच या चित्रपटाच्या सिक्वेलची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.
त्याचवेळी, चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे शूटिंग लवकरच सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नुकतेच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यासाठी एका पूजेचेही आयोजन करण्यात आले होते, ज्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले. पहिल्या भागाचे नाव ‘पुष्पा द राईज’ तर दुसऱ्या भागाचे नाव ‘पुष्पा द रुल’ असे असेल.
पुढील वर्षी जानेवारीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याची माहिती इन्स्टाग्रामवरील एका पेजवरून शेअर करण्यात आली आहे. आता जिथे आपण या चित्रपटाबद्दल उत्सुकतेने पाहत आहोत, तिथेच दुसऱ्या भागाच्या स्टारकास्टबद्दल विविध बातम्या समोर येत आहेत. अल्लू अर्जुन या चित्रपटासाठी 125 कोटी घेत असल्याचे इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे.
त्याचबरोबर सुकुमार यासाठी 50 कोटी घेत आहे आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना 5 कोटी घेत आहे. हा चित्रपट जानेवारी महिन्यात जगभरातील पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनीही या पोस्टवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. बहुतेक चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे सांगत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुन सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात पुष्पा 2 चे शूटिंग सुरू करू शकतो. काही वेळाने रश्मिका मंदान्ना देखील चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पुष्पा द राइज 21 डिसेंबर 2021 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या तेलगू व्हर्जनने तर खळबळ उडवून दिली होतीच, शिवाय हिंदीतही हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.
महत्वाच्या बातम्या-
पुष्पा 2 मध्ये अल्लु अर्जुन दोन खलनायकांसोबत लढणार, ‘या’ सुपरस्टारची चित्रपटात एन्ट्री
झुकेगा नहीं साला! ‘पुष्पा २’ साठी अल्लू अर्जूनने घेतले तब्बल ‘एवढे’ कोटी मानधन; वाचून डोळे पांढरे होतील
अल्लू अर्जुनच्या 500 कोटींच्या ‘पुष्पा 2’ची रिलीज डेट आऊट, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
Pushpa 2: ‘पुष्पा २’ बाबत समोर आली मोठी अपडेट, श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ अभिनेत्री, चाहते उत्सुक