दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जून ‘पुष्पा’ या चित्रपटामुळे फारच लोकप्रिय झाला आहे. त्याच्या या चित्रपटाने अक्षरश: सर्वांनाच वेड लावले आहे. ‘पुष्पा’ चित्रपटानंतर अल्लू अर्जूनच्या लोकप्रियतेत अधिक भर पडली आहे. दक्षिणेसोबत संपूर्ण भारतभर त्याचे चाहते वाढले आहेत. अशात त्याच्यासंबंधित प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यास चाहते खूपच उत्सुक आहेत. त्यामुळेच त्याच्यासंबंधित प्रत्येक बातमी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यादरम्यान आता अल्लू अर्जूनची एक पोस्ट सध्या फारच चर्चेत आहे. यामध्ये अल्लू अर्जून त्याच्या मुलीने केलेल्या स्वागताबाबत (Allu Arjun Daughter Arha) सांगत आहे.
अल्लू अर्जुन नुकताच दुबईवरून घरी परतला आहे. दुबईला गेल्याने तो जवळपास १६ दिवस आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहिला. त्यामुळे त्याची मुलगी अरहा तिच्या वडिलांना खूपच मिस केली. अशात आपले वडिल १६ दिवसानंतर घरी परतणार असल्याने अरहाने वडिल अल्लू अर्जूनला सरप्राईज देण्याचे ठरवले. त्यानुसार तिने अल्लू अर्जूनच्या स्वागतासाठी फुलांनी सजावट केले.
अरहाने जमिनीवर फुलांनी ‘वेलकम नाना’ असे लिहिले. लेकीने केलेला हा प्रेमळ स्वागत पाहून अल्लू अर्जूनही भारावून गेला. त्यामुळे त्याने या फुलांच्या सजावटीचा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्याने लिहिले की, प्रेमळ स्वागत… १६ दिवस परदेशात राहिल्यानंतर’. या फोटोत अरहासुद्धा असून ती खूपच क्यूट अंदाजात दिसून येत आहे.
अल्लू अर्जूनची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत हार्टच्या इमोजी शेअर करत आहेत. नुकतीच काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जूनने अरहासोबतचा एक फोटो शेअर केला होता. यामध्ये बापलेक सेल्फी घेताना दिसून आले. फोटो शेअर करत अल्लू अर्जूनने लिहिले की, ‘माझी फेव्हरेट टाईमपास अरहा’.
अल्लू अर्जूनने ‘गंगोत्री’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. मात्र, ‘आर्या’ या चित्रपटामुळे त्याला खूप लोकप्रियता मिळाली. तेलुगूसोबत त्याची हिंदीतही फार क्रेझ आहे. हिंदीत डब केलेले त्याचे अनेक चित्रपट टीव्हीवर खूप पाहिले जात असत. तर आता त्याचा ‘पुष्पा’ हा चित्रपट तेलुगूसह तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदीत भाषेत प्रदर्शित झाला. त्यामुळे त्याच्या हिंदी चाहत्यांना त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळाली.
दरम्यान अल्लू अर्जूनने ६ मार्च २०११ रोजी स्नेहा रेड्डीसोबत लग्न केले. त्यानंतर ३ एप्रिल २०१४ रोजी त्यांचा पहिला मुलगा अयानचा जन्म झाला. त्यानंतर दोन वर्षांनी २०१६ मध्ये मुलगी अरहाचा जन्म झाला. स्नेहा आणि अर्जून नेहमी त्यांच्या मुलांसोबत वेळ घालवताना दिसून येतात. तसेच अनेकदा ते त्यांच्या मुलांचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळत असते.
महत्त्वाच्या बातम्या :
Bigg Boss 15 Finale : बिग बॉस फिनालेच्या अगोदरच लीक झाले विजेत्याचे नाव? फोटो होतोय व्हायरल
अनुपम खेर यांनी अल्लू अर्जूनचे केले तोंडभरून कौतुक; अभिनेत्यासोबत काम करण्याची व्यक्त केली इच्छा
पुर्ण कपडे घालून पण रकुल प्रीत ठरली Oops Moment ची शिकार, नको तेच दिसलं; फोटो व्हायरल






