संपूर्ण क्रांती दिनाच्या निमित्ताने बिहारमधील पाटणा(Patna) येथील बापू सभागृहात महाआघाडीच्या वतीने प्रातिनिधिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय जनता दल आणि डाव्या पक्षांचे नेते हजर होते. यावेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्यातील कामांचा पाठपुरावा घेत बिहार सरकारवर टीका केली आहे. (“All three army chiefs are Hindus, President, Prime Minister is Hindu, how can Hindus be in danger anyway? Big leader’s question)
शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, कायदा आणि सुव्यवस्था या सर्व मुद्द्यांमध्ये सुधारणा घडवून आणण्यात बिहार सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. यावेळी बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि लालूप्रसाद यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
“तीनही लष्करप्रमुख हिंदू आहेत. हवाई दल असो, नौदल असो, लष्कर असो, देशाचा राष्ट्रपती हिंदू आहे. देशाचा पंतप्रधान हिंदू आहे. तरीही देशात हिंदूंना धोका आहे, असे भाजप कसे काय म्हणू शकते. देशातील कोणत्याही राज्यात मुस्लिम मुख्यमंत्री नाही. यानंतरही हिंदूंना धोका आहे का?”, असा सवाल तेजस्वी यादव यांनी उपस्थित केला आहे.
बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव पूढे म्हणाले की, “हिंदू कधीही धोक्यात नव्हता आणि कधीच नसेल. हिंदूंना धोका आहे, असे म्हणणाऱ्यांची खुर्ची सध्या धोक्यात आहे. म्हणूनच ते हिंदूंना धोका आहे, असे म्हणत आहेत”, असे तेजस्वी यादव यांनी सांगितले आहे. भाजप आमदारांना मुस्लिमांचा मतदानाचा हक्क हिसकावून घ्यायचा आहे, असे देखील तेजस्वी यादव यांनी सांगितले आहे.
नितीश कुमार यांच्या सरकारवर टीका करताना विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव म्हणाले की, ” नितीश कुमारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी दिलेल्या आश्वासन पूर्ण करावे. बिहारमधील तरुणांना १९ लाख नोकऱ्या मिळाव्यात. तसेच बिहार राज्याला विशेष दर्जा विशेष दर्जा देण्याची केंद्र सरकारकडे मागणी करावी, हे आश्वासन नितीश कुमारांनी पूर्ण करावे”, असे तेजस्वी यादव यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
ब्रिजभूषणचा अयोध्येत फुसका बार, ५ लाख लोक जमवण्याचा दावा, पण फक्त ५ हजार लोक जमली
मला मुद्दाम सचिनला जखमी करायचे होते कारण…, शोएब अख्तरने सांगितला ‘तो’ धक्कादायक किस्सा
लिलावात अनसोल्ड राहिला होता ‘हा’ खेळाडू, हार्दिक पांड्याने दाखवला विश्वास अन् गाजवले मैदान