बिबट्या सफरीचा मुद्दा घेऊनच आम्ही निवडणुका लढलो. मात्र अर्थसंकल्पात बारामतीच्या बिबट सफारीसाठी ६० कोटीची तरतूद केली आहे. जुन्नरची बिबट सफारी बारामतीला या घोषणेमुळे जुन्नरची जनता व्यथित झाली आहे. यामुळे मला लोकप्रतिनिधी म्हणून मोठ्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.(All the projects went from Bara to Nenya to the NCP leaders)
यामुळे हा प्रकल्प जुन्नरमध्येच व्हावा. या मागणीचे पत्र मंगळवारी जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिले आहे. जुन्नरची प्रस्ताविक बिबट्या सफारी बारामतीला स्थलांतरित झाल्यामुळे जुन्नर तालुक्यात मोठा रोष निर्माण झाला आहे.
सफारीची मागणी आणि पाठपुरवठा २०१६ पासून शिवसेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख आणि माजी आमदार शरद सोनवणे करत आहेत. मात्र अर्थसंकल्पनात अचानक बारामतीच्या बिबट सफारीच्या निधीच्या तरतुदीची घोषणा झाल्याने जुन्नर तालुका ढवळून निघाला आहे. यामुळे शिवसेना राष्ट्रवादी यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे.
या संघर्षात उद्वीग्न लोकभावनेचा आदर करत आमदार बेनके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र दिले आहे. सफारी जुन्नरलाच करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पत्रात बेनके म्हणाले की, २०१६ साली बिबट सफारी प्रकल्प जुन्नरला व्हावा.
यासाठी तत्कालीन वनमंत्री यांच्या दालनात बैठक झाली होती. त्यास शासनाने अनुकूलता दाखवून संबधित विभागाचे सचिव, वास्तुविशारद यांनी आंबेगव्हाण येथील जागेची पाहणी केली होती. त्याचबरोबर डिपीआरसाठी दिड कोटी रुपये मंजूर केले होते. त्यातील ६५ लाख अदा करणार होते.
मात्र ते झाले नाहीत आणि त्यामुळेच हा प्रकल्प पुढे गेला नाही. तेव्हा पासून जनतेमध्ये या प्रकल्पाबाबत उत्सुकता होती. हेच मुद्दे घेऊन मी निवडणुक लढली. मात्र बजेटमध्ये हा प्रकल्प बारामतीला होणार या घोषणेमुळे जुन्नरची जनता व्यथित झाली आहे.
शासनाच्या धोरणासाठी जुन्नर अनुकूल असताना, हा प्रकल्प बारामतीला नेण्याचा घाट का घातला जात आहे?, अशी लोकभावना झाली आहे. यामुळे जनतेच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे हा प्रकल्प जुन्नरलाच व्हावा, अशी माझ्यासह सर्वपक्षीयांची मागणी आहे.
त्याचा सकारात्मक विचार व्हावा, अशी मागणी बेनके यांनी पाठवलेल्या पत्रामार्फत केली आहे. मात्र जुन्नरमधील प्रस्तावित बिबट्या सफारी बारामतीला स्थलांतरित होण्याबाबतच्या प्रकरणी भाजपचे नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बिबट्या सफारीसाठी जुन्नर हे पोषक वातावरण आहे, असे म्हणाले आहेत.
जुन्नरमध्ये सफरीची गरज असल्याने सफारी जुन्नर मध्येच व्हावी, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. सगळेच प्रकल्प बारामतीला न नेता जिल्ह्याचा संतुलित विकास व्हावा, असा सल्ला अजित पवार यांना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
लाच घेण्याऱ्या दिल्ली पोलिस अधिकाऱ्याला युपी पोलिसांनी केली अटक; ‘अशी’ झाली पोलखोल
‘त्या’ नेत्यांना तिकीट देण्यास मीच नकार दिला; नरेंद्र मोदींचा मोठा खुलासा