Share

सर्व भारतीय व्हॉट्सअप डीपीवर तिरंगा ठेवतीलच, पण देशाच्या जी’डीपीचे काय?

भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करणार आहोत. या निमित्ताने केंद्र सरकार ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबवत आहे. मोदी सरकारने या मोहिमेची दणक्यात घोषणा केली. परंतु महाराष्ट्राचे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केंद्र सरकारच्या या मोहिमेवर टीका केल्याचे दिसते. (All Indians will put the tiranga on WhatsApp DP, but what about the country’s G’DP?)

सर्व भारतीय आपल्या डीपीवर तिरंगा ठेवतील. पण देशाच्या जीडीपीचे काय? असा रोखठोक सवालच नाना पटोले यांनी केंद्र सरकारला विचारलाय. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी असे वक्तव्य केले आहे.

नाना पटोले म्हणाले की, केंद्र सरकार ओबीसींचा वापर फक्त मतांसाठी करते. ओबीसींची जनगणना असेल अथवा त्यांचा टक्का इतर ठिकाणी वाढण्याबाबत कोणताही अजेंडा या सरकारकडे नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

अग्निपथ ही योजना ओबीसींना आरक्षणाचा लाभ मिळू नये, यासाठीच सुरू करण्यात आली,असा आरोप यावेळी नाना पटोलेंनी केला. अग्निपथसारख्या योजना खाजगीकरणाला प्रोत्साहन देणाऱ्या असल्याचं ते म्हणाले.

पुढे पटोले असंही म्हणाले की, ओबीसी समाज हा शेतीशी जोडलेला आहे. आणि आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. भारतीय नागरिक व्हॉट्सअप डीपीला तिरंगा ठेवलच पण देशाच्या जीडीपीची चिंता कोण वाहणार? त्यात सुधारणा कधी होणार, असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे.

अशाप्रकारे देशातील इतर समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होताना दिसतो आहे. ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम कौतुकास्पद असली तरी देशातल्या वास्तविक प्रश्नावर नेमकेपणाने बोट ठेवत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या-
टॅटू गोंदवल्यामुळे १४ जणांना झाला एड्स; कसा घडला हा भयानक प्रकार?वाचून हादराल
Tejas Thackeray: तेजस ठाकरेंच्या राजकीय प्रवेशाबाबत चर्चा सुरु असताना मिलिंद नार्वेकरांचे खास ट्विट; म्हणाले…
Amit Thackeray: एकनाथ शिंदेंचे बंड झाले नसते तर तुम्ही राज्यभर दौरे केले असते का? अमित ठाकरेंचा आदित्यला सवाल

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now