एलियन्सचे गूढ आजपर्यंत कोणीही सोडवू शकलेले नाही. एलियन्स खरच अस्तित्वात आहेत की नाही याचे उत्तर अद्याप शास्त्रज्ञांनाही मिळू शकले नाही. मात्र, या एलियन्स बाबत जगातील अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचे दावे केले आहेत. सध्या अशाच एका दाव्याची प्रचंड चर्चा होत आहे.
एलियन्स बाबत एका टाइम ट्रॅव्हलरने दावा केला आहे. केलेला हा दावा आश्चर्यकारक आहे. या वर्षी ८ डिसेंबरला एलियन्स पृथ्वीवर उतरतील, असा दावा एका टाइम ट्रॅव्हलरने केला आहे. त्याने टिकटॉकवर एक व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
त्याने व्हिडीओमध्ये एलियन आणि स्वत: टाइम ट्रॅव्हलर असल्याचा दावा केला आहे. त्याच्या या व्हिडिओने संपूर्ण जगात खळबळ माजवली आहे. या स्वयंघोषित टाईम ट्रॅव्हलने आपल्या दाव्याला पुष्टी देण्यासाठी व्हिडिओ आणि फोटो देखील दाखवले आहेत.
त्या व्यक्तीच्या दाव्यानुसार, या वर्षी ३० नोव्हेंबर जेम्स वेब टेलिस्कोप एक नवीन ग्रह शोधेल, जो पृथ्वीसारखाच असेल. त्याचवेळी त्याने असा दावाही केला आहे की, यावर्षी ८ डिसेंबरला एक उल्का पृथ्वीवर धडकणार आहे. त्याच्या या दाव्याकडे सगळयांचे लक्ष गेलं आहे.
तसेच व्हिडीओमध्ये व्यक्ती असाही दावा करतो की, मार्च २०२३ मध्ये वैज्ञानिकांची एक टीम प्राचीन प्रजाती शोधून काढेल. तसेच मे २०२३ मध्ये अमेरिकेत भयानक त्सुनामी येईल. त्या व्यक्तीचे म्हणणे आहे की तो टाइम ट्रॅव्हलर आहे आणि तो २६७१ मधून टाइम ट्रॅव्हल करुन परतला आहे.
दरम्यान, जरी विज्ञानाकडे अद्याप टाइम ट्रॅव्हल करण्याचे कोणतेही सूत्र नसले तरीही काही अशा थेरीज आहेत जे हे मानतात की टाइम ट्रॅव्हल शक्य होऊ शकतं. पण, सध्यातरी टाइम ट्रॅव्हल ही केवळ एक संकल्पना आहे. त्यामुळे टाइम ट्रॅव्हल कडून आलेले दावे कितपत खरे आहेत याबाबत शंका आहे.