Share

‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाची दमदार सुरूवात; पहिल्याच दिवशी केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई

Gangubai Kathiawadi

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) बहुचर्चित ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट काल शुक्रवारी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून पहिल्याच दिवशी चित्रपटाने चांगली कमाई करत दमदार सुरुवात केली आहे. समोर येत असलेल्या बातम्यांनुसार चित्रपटाने पहिल्याच दिवशी जवळपास १० कोटी रूपयांची कमाई केली आहे. तर आता पुढेही हा चित्रपट अशाच प्रकारे कमाई करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत सांगितले की, ‘गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट पहिल्याच दिवशी सर्वांना आश्यर्यचकित करत मोठी कमाई केली आहे. कोरोना काळापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘राझी’ चित्रपटापेक्षा ‘गंगूबाई काठियावाडीने’ जास्त कमाई केली आहे. दुसरीकडे उद्योग किंवा व्यापारद्वारे हा चित्रपट ६.२५ कोटी किंवा ७.२५ कोटींची कमाई करेल, अशी अपेक्षा करत असताना चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात १०.५० कोटींची कमाई केली आहे’.

बॉक्स ऑफिस इंडियाच्या एका रिपोर्टनुसार ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी जोरदार सुरुवात करत ९.५० ते १० कोटींच्या दरम्यान कमाई केली आहे. तसेच रिपोर्टनुसार चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची कमाई मुंबईतील रणवीर सिंहच्या ‘८३’ चित्रपटाच्या कमाईसोबत मॅच करू शकते. अशात शनिवारीसुद्धा हा चित्रपट अधिक चांगला बिझनेस करू शकेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोरोनाच्या निर्बंधामुळे सध्या सिनेमागृह ५० टक्के क्षमतेने सुरु आहेत. तसेच अधून-मधून सिनेमागृह बंद होत असल्याने त्याचाही परिणाम चित्रपटांच्या कमाईवर होत आहे. सोबतच सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहण्याची लोकांची सवयसुद्धा आता बदलली आहे. लोक आता घरातच बसून स्मार्ट फोन किंवा टीव्हीवर चित्रपट पाहण्यास पसंती देत आहेत. अशात ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केल्याने पुढेही हा चित्रपट यशस्वीरित्या कमाई करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट हुसैन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटात गंगूबाई यांचा संघर्षमय जीवन दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. तर आलियासोबत या चित्रपटात अजय देवगन आणि विजय राज मुख्य भूमिकेत आहेत.

कोण होत्या गंगुबाई काठियावाडी

गंगूबाई या गुजरातमधील काठियावाड येथे राहणाऱ्या होत्या. लहान वयातच त्यांचे एका मुलावर प्रेम झाले होते आणि लग्न करून त्या मुंबईत आल्या. पण मोठी स्वप्न पाहणाऱ्या गंगूबाई यांनी त्यांच्या पुढे काय वाढून ठेवलं जाणार आहे, याचा विचारही केला नव्हता. गंगूबाई यांच्या नवऱ्यानेच त्यांना केवळ ५०० रूपयांसाठी कमाठीपुरा येथे कोठ्यावर विकले. त्यानंतर काही काळ वेश्याव्यवसायात संघर्षमय जीवन जगल्यानंतर गंगूबाई यांनी ते वास्तव स्वीकारले. त्यानंतर पुढे जाऊन त्याच माफिया क्वीन झाल्या. त्यानंतर त्यांनी देहविक्री करणाऱ्या आणि अनाथ मुलांसाठी काम करण्यास सुरुवात केली.

महत्त्वाच्या बातम्या :
सनी देओलचे करिअर फ्लॉप करायला निघालेले महेश भट्ट स्वतःचे करोडोचे नुकसान करून बसले
महेश भट्ट सर्वांसमोर मला मुलगी म्हणून बोलावयाचे, पण रात्री मात्र हाॅटेलमध्ये…
फक्त जॅकलीनलाच नाही तर ठग सुकेशनने या अभिनेत्रींनाही दिले आहेत महागडे गिफ्ट्स, नावं वाचून अवाक व्हाल

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now