बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) नुकतीच विवाहबंधनात अडकली. १४ एप्रिल रोजी कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत तिने अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्नगाठ बांधली. तर आता लग्नानंतर आलिया पहिल्यांदाच घराबाहेर पडली आहे. नुकतीच ती एका विमानतळावर दिसून आली. यावेळी आलियाने आपल्या लूकद्वारे सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
आलिया नुकतीच कलीना विमानतळावर दिसून आली होती. यावेळी तिच्यासोबत डिझाईनर मनीष मल्होत्रासुद्धा उपस्थित होते. यादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केले. यावेळी आलिया विमानतळावर लाईट पिंक कलरच्या प्लाजो सूटमध्ये दिसून आली.
माथ्यावर बिंदी, हातात मेहंदी अशा साध्या लूकमध्ये आलिया खूपच सुंदर दिसत होती. परंतु, यावेळी आलियाच्या हातात लग्नाचा चुडा दिसला नाही. त्यामुळे अनेकजण यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. या फोटो आणि व्हिडिओवर अनेक नेटकरी कमेंट करत ‘इतक्या लवकर चुडा काढला का?’ असा प्रश्न आलियाला विचारत आहेत.
एकाने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, ‘अरे इतक्या लवकरच चुडा काढलापण?’. दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘चुडा काढला पण? हे स्टार लोक चुडा का घालत नाहीत?’ यासोबतच इतरही अनेक नेटकरी कमेंट करत म्हणत आहेत की, ‘तिचे लग्न झाले असे अजिबात वाटत नाहिये. ना तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे ना भागांत सिंदूर’.
दरम्यान मागील काही दिवसांपासून अशा बातम्या समोर येत होत्या की, आलिया आणि रणबीर लग्नानंतर हनिमूनला न जाता लगेचच कामावर परतणार आहेत. रणबीर कपूर नुकताच चित्रीकरणासाठी पोहोचला असून आता आलियासुद्धा तिच्या कामावर परतली आहे.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास रणबीर आणि आलिया लवकरच ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहेत. ९ सप्टेंबर रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आलिया आणि रणबीरसोबत या चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जून आणि मौनी रॉय मुख्य भूमिकेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
आलिया-रणबीरच्या मेहंदीच्या वेळी करण जोहरसोबत घडला होता मजेशीर प्रकार, वाचून पोट धरून हसाल
१९ वर्षांच्या ‘या’ मराठमोळ्या पठ्याने एडिट केलीय यशची ३०० कोटींची मेगाबजेट फिल्म ‘KGF 2’
मौनी रॉय आणि सूरज नांबियारच्या नात्यात दुरावा? ‘त्या’ एका पोस्टमुळे चर्चांना उधाण