मागील काही दिवसांपासून ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. या चित्रपटासोबतच आलिया भट्ट देखील चर्चेत आहे. या चित्रपटासाठी तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. मात्र अभिनेत्री कंगना राणावतने तिच्यावर टीका केली. पण यावेळी आलियाने देखील तिला प्रत्योत्तर दिले आहे.
सध्या आलिया ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच दरम्यान चित्रपटाच्या प्रमोशन वेळी आलियाने तिला प्रत्योत्तर दिले आहे. आलियाला कंगना ‘पापा की परी’ अशी टीका केली होती. ज्याबद्दल आलियाने तिला उत्तर दिले आहे. याबाबत विचारले असता आलियाने अगदी शांत पद्धतीने उत्तर दिले.
यावर प्रतिक्रिया देत आलिया भट्टने भगवत गीतेतील एका वाक्याचा उदाहरण म्हणून दिले. आलिया म्हणाली की, “भगवान श्रीकृष्णाने भगवत गीतेत सांगितले आहे की, कधीही काहीही न करणे म्हणजे काहीतरी करण्यासारखे आहे. मला या विषयावर एवढेच म्हणायचे आहे.” असे म्हणत आलियाने कंगनाला जबरदस्त उत्तर दिले आहे.
खरंतर कंगना आलिया भट्टवर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याअगोदर ही कंगनाने आलियाच्या अभिनयाबाबत आणि तिच्या चित्रपटांबाबत अनेकदा टीका केल्या आहेत. मात्र नेहमी प्रमाणे आलियाने कंगनाला उत्तर देणं टाळलं होत. मात्र या वेळेस तिने मोजक्याच शब्दात उत्तर दिले.
हा सर्व प्रकार असा की, कंगनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली होती. यामध्ये तिने आलियाच्या आगामी चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटावर टीका केली. कंगनाने असे लिहिले होते की, ‘या शुक्रवारी २०० कोटी रुपये मातीत जातील. पापा (चित्रपट माफिया डॅड) की परी (जिच्याकडे ब्रिटीश पासपोर्ट आहे)’ कारण ती अभिनय करू शकते. हे रोमकॉम बिम्बोने सिद्ध करावे अशी पापाची इच्छा आहे. या चित्रपटाचा सर्वात मोठा दोष म्हणजे त्याची कास्टिंग. त्यात सुधारणा होणार नाही. मग त्या चित्रपटाचे स्क्रीन दक्षिणेकडे नेणे असो की हॉलिवूडकडे. जोपर्यंत चित्रपट माफियांची सत्ता आहे, तोपर्यंत बॉलीवूड नष्ट होणार आहे.’
अशा पद्धतीने कंगनाने आलियावर टीका केली आहे. जेव्हापासून कंगनाने ही पोस्ट केली आहे. तेव्हापासून सर्व सोशल मीडियावर ‘गंगूबाई काठियावाडी’ याच चित्रपटाची चर्चा सुरू आहे. अशी टीका करत कंगनाने हा चित्रपट फ्लॉप होण्याचे भाकीत केले आहे. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच समजेल की, कांगनाने केले भाकीत कितपत खर होईल.