‘द कपिल शर्मा‘ (The Kapil Sharma) शोमध्ये असा एकही चेहरा नाही ज्याला लोक ओळखत नाहीत. शोमध्ये आजीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण करणारा कॉमेडियन अभिनेता अली असगर (Ali Asghar) हा देखील शोचा असाच एक सदस्य आहे. कपिल शर्मा आणि त्याच्या टीमसोबत काही मतभेदांमुळे अलीने पाच वर्षांपूर्वी 2017 मध्ये शो सोडला होता. शोमधून बाहेर पडल्यानंतर अलीने एक मुलाखत दिली ज्यामध्ये त्याने एक मोठा खुलासा केला.(Ali Asghar explained why Kapil Sharma left the show)
अलीने शो सोडण्याचे कारण सांगितले होते. एका वृत्संस्थेच्या रिपोर्टनुसार तो म्हणाला होता की, हे दुर्दैवी आहे. असे प्रसंग येतात जेव्हा तुम्ही एका चौकात येऊन उभे असता आणि तुम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागतो. मी शो आणि स्टेज मिस करतो. आम्ही एक टीम म्हणून काम सुरु केले होते. पण एक वेळ आली जेव्हा व्यावसायिकदृष्ट्या मला वाटले की खूप जास्त आहे.
माझी व्यक्तिरेखा अडगळीत पडल्याने आणि माझे काम ठप्प झाल्याने क्रिएटिव्ह मतभेदांमुळे मी शो सोडला. त्यात सुधारणेला वाव नव्हता. अलीकडेच, अलीने आणखी एका मुलाखतीत ओटीटी शो न करण्यामागचे कारण सांगितले. तो म्हणला की, ‘कॉमेडियनची इमेज खूप मजबूत असते. त्यामुळे लोकांना मला इतर कोणत्याही भूमिकेत पाहायला आवडेल असे वाटत नाही. मी टीव्हीवर काही ड्रॅग कॅरेक्टर साकारले आहेत.
आपले म्हणणे पुढे चालू ठेवत अलीने सांगितले की, त्याला स्टिरिओटाइपची पर्वा नाही. तो विशिष्ट दिशेने आपले कार्य करतो. ‘मी विविध भूमिका साकारल्या आहेत. मी लोकांना समजावून सांगू शकत नाही. मी त्यांना एवढेच सांगू शकतो की मी अष्टपैलू आहे आणि मला आपल्या प्रोजेक्टमध्ये काम द्या. बरं, मी जे केलं त्यात मी समाधानी आहे.
या शोमध्ये अली असगर ‘दादी’च्या भूमिकेत दिसला होता. त्यांची ही भूमिका लोकांना खूप आवडली. दुसरीकडे सुनील ग्रोवरनेही गुत्थीच्या भूमिकेत लोकांना खूप हसवले. सुनीलने शो सोडल्यानंतर अलीनेही द कपिल शर्मा शोचा निरोप घेतला.
महत्वाच्या बातम्या-
देवदूत! भर युद्धात 2424 किमी बाईक चालवत पोहोचला आणि लोकांपर्यंत पोहोचवल्या आवश्यक वस्तू, औषधे
रशिया-युक्रेन युद्धात आता सोनम कपूरची उडी; म्हणाली, या युद्धात भारतीय लोकांना दोन्ही बाजूंनी..
..त्यामुळे साताऱ्यातील आपशिंगे गावाला मिलिटरीने थेट रणगाडाच दिला भेट, गावात जल्लोषाचे वातावरण
मणिपूर आणि गोव्यात कोणाचे सरकार येणार? एबीपी न्यूज-सी वोटर ओपिनीयन पोलमधून झाला खुलासा