(Monsoon sessions): आले रे आले गद्दार आले, ५० खोके घेऊन ओक्के झालेले आले; शिंदे गटातील आमदारांचा सर्वांसमोर पाणउतारा

पावसाळी अधिवेशन(Monsoon sessions): राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काही तरी वाद निर्माण होईल असे सर्वांना वाटत होते. अपेक्षेप्रमाणे दिवस वादळी ठरताना दिसत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला महाविकास आघाडीतर्फे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आक्रमक आंदोलन करण्यात आले.

सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वीच विरोधक विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकत्र जमून घोषणाबाजी करत होते. यावेळी मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांना पाहताच महाविकास आघाडीने घोषणाबाजी करत ‘बघताय काय सामील व्हा’ असे आवाहन केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे तेव्हा माध्यमांशी बोलत होते. संजय शिरसाट यांना बघताच धनंजय मुंडे अधिक आक्रमक झाले. त्यावेळी त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी एक घोषणा दिली. ‘अरे संजय शिरसाटला मंत्रिपदं न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’. भाजपचे आमदार आशिष शेलारसुद्धा त्याठिकाणी आले. तेव्हादेखील महविकास आघाडीच्या आमदारांनी अशीच घोषणाबाजी केली. शेलार यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मजेत हात उंचावून विरोधकांच्या बोलण्याला जणूकाही ते सहमत आहे असे दाखविले.

शिंदे गटाचे अनेक आमदार विधानभवनाजवळ पोहोचले तेव्हा मात्र शिवसेना आक्रमक झाली. यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी,’आले रे आले, गद्दार आले’, ‘५० खोके आले आले’, अशा घोषणा दिल्या. मात्र, शिंदे गटाच्या आमदारांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे आता सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर पुढे काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आजपासून (१७ ऑगस्ट) पावसाळी अधिवेशन सुरू झाले. आठवडाभर हे अधिवेशन चालणार आहे. कालावधी खूप कमी आहे. इतका कमी कालावधी असतानाही अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. सत्ता बदलानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शिंदे सरकारच्या मंत्र्यांना अनेक मुद्द्यांवरून जाब विचारला जाईल. या सगळ्याला शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्री कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या
Eknath Shinde : अधिवेशन काळात ‘या’ मुद्द्यावरून एकनाथ शिंदे गट येणार अडचणीत; सरकारचीही सत्वपरीक्षा
स्वातंत्र्यदिनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ स्टेटस ठेवणाऱ्या शिक्षकाला ठोकल्या बेड्या; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
‘त्या सीसीटीव्हीत बरेच काही सापडेल’; मेटे यांच्या ड्रायव्हरने केला मोठा खुलासा
‘त्या सीसीटीव्हीत बरेच काही सापडेल’; मेटे यांच्या ड्रायव्हरने केला मोठा खुलासा