Share

“हिंदूंचा नायनाट करण्यासाठी पाकीस्तानने पुढाकार घ्यावा, मुस्लिम देशांनी एकत्र येत त्यांना पाठींबा द्यावा”

al-aqsa-mosque
अलीकडेच काही दिवसांपूर्वी एका टिव्ही शो मध्ये बोलत असताना भाजप प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी प्रेषित महंमद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. नुपूर शर्मा यांनी पैंगबर मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे देशभरात गदारोळ माजला. सहा वर्षांसाठी त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

याशिवाय, भाजपा दिल्ली मीडियाचे प्रमुख नवीनकुमार जिंदाल यांनाही निलंबित करण्यात आले आहे. याचबरोबर मुस्लिम समाजातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. नुपूर शर्मा यांच्यावर कारवाईची माहणी होत होती. तर आता पॅलेस्टाईनमधूनही विरोध केला जातं आहे.

10 जून रोजी भाजप नेत्यांच्या मोहम्मद पैगंबरांवरील वक्यव्यांविरोधात जेरुसलेमच्या अल अक्सा मशिदीवर हिंदूं विरोधात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पॅलेस्टाइनचे इस्लामिक स्कॉलर निधाल सियाम यांनी आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली. यामुळे नवीन वादाला तोंड फुटणार असल्याच बोललं जातं आहे.

वाचा या रॅलीमध्ये निधाल सियाम यांनी काय म्हंटलं आहे..? सियाम यांनी गायींची पूजा करणाऱ्या हिंदूंविरोधात जिहाद सुरू करण्याचे जाहीर आव्हान केले आहे. त्यांनी यावेळी बोलताना अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. तुमचा धर्म आणि मोहम्मद पैगंबरांना पाठिंबा देण्याची हीच खरी वेळ नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले, ‘पाकिस्तानी नागरिकहो, इतर कुठल्याही देशापेक्षा, हिंदूंचा सामना करण्याची तुमची जबाबदारी अधिक आहे. यावेळी बोलताना त्यांनी मुस्लिम देशांना हिंदूंविरोधात एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याचबरोबर हिंदूंचा सामना करण्यासाठी मैदानात उतरण्याची वेळ आली असल्याच देखील त्यांनी यावेळी नमूद केले.

दरम्यान, नुपूर शर्मा यांच्या विधानाचे पडसाद आता आखाती देशात देखील उमटू लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पैंगबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त विधानामुळे बहरीन, कतार, कुवेत, इराण आणि ओमानसारख्या आखाती देशात भारताविरोधात तीव्र शब्दात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now