Akshay Kumar, Raksha Bandhan, Boycott, Aamir Khan, Lal Singh Chadha/ सोशल मीडियावर सध्या एक ट्रेंड सुरु आहे. जेव्हा जेव्हा एखादा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होणार असतो, त्याच्या काही दिवस आधी चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणारे हॅशटॅग चालवले जातात. आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ आणि अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘रक्षाबंधन’ या सिनेमांबाबतही सध्या असंच काहीसं घडतंय. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही चित्रपटांबाबत ट्विटरवर बहिष्कार मोहीम राबवली जात आहे.
या दोन्ही चित्रपटांवर ट्विटरवर बहिष्कार टाकण्याची कारणे वेगळी आहेत. हे दोन्ही चित्रपट ११ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होत आहेत. आता चित्रपट प्रदर्शित होण्याच्या दोन दिवस आधी अक्षयने आपल्या चित्रपटाच्या बहिष्काराच्या ट्रेंडबद्दल बोलले आहे.
Rishta hai inka anmol jo bandha hai pyaar ke dhaagon se.
Advance booking for this extraordinary tale is open now. 🙌🏻Book your tickets now.https://t.co/GHpI5yo4TGhttps://t.co/jZBfjyeMnn#RakshaBandhan releasing in cinemas on 11th August 2022. #ReturnToFeelings pic.twitter.com/vue2zIpsmI
— Akshay Kumar (@akshaykumar) August 5, 2022
अक्षय कुमार ८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या प्रमोशनसाठी कोलकाता येथे होता, जिथे त्याने या विषयावर मीडियाशी संवाद साधला. वृत्तानुसार अक्षय म्हणाला, जर तुम्हाला चित्रपट पाहायचा नसेल तर तो पाहू नका. हा एक स्वतंत्र देश आहे आणि चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे, कोणाला चित्रपट पहायचा असेल किंवा पाहू इच्छित नसेल तर ते त्यांच्यावर अवलंबून आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, कोणताही उद्योग असो, वस्त्रोद्योग असो किंवा चित्रपट उद्योग, सर्व देशाच्या अर्थव्यवस्थेला मदत करतात. त्यामुळे चित्रपटांवर बहिष्कार टाकण्यात काहीही अर्थ नाही.
याआधी आमिर खाननेही चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याच्या ट्रेंडवर एका संभाषणात म्हटले होते की, असे अनेक लोक जे हा ट्रेंड चालवत आहेत, त्यांना वाटते की मी या देशावर प्रेम करत नाही. मात्र मी या देशावर खूप प्रेम करतो आणि मी असाच आहे. पण हे दुर्दैवी आहे की, काही लोक असा विचार करतात. मी सर्वांना सांगू इच्छितो की असे अजिबात नाही, म्हणून कृपया माझा चित्रपट पहा.
अक्षय कुमारच्या रक्षाबंधन या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले आहे. या चित्रपटात अक्षयचे त्याच्या चार बहिणींसोबतचे सुंदर नाते पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अक्षय व्यतिरिक्त भूमी पेडणेकर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची टक्कर आमिर खानच्या लाल सिंग चड्ढासोबत आहे. आता बघूया कोणत्या चित्रपटाला प्रेक्षकांचे जास्त प्रेम मिळते.
रक्षाबंधन आणि लाल सिंग चड्ढा हे या वर्षातील मोठ्या रिलीजपैकी एक आहेत. दोन्ही चित्रपटांकडून चाहत्यांना खूप आशा आहेत. 2022 हे वर्ष बॉलिवूडसाठी चांगले राहिले नाही. बहुतेक चित्रपट थिएटरमध्ये चालले नाहीत. अशा परिस्थितीत सणासुदीच्या काळात प्रदर्शित होणाऱ्या दोन्ही चित्रपटांकडून चांगले कलेक्शन अपेक्षित आहे.
महत्वाच्या बातम्या-
Boycott: लाल सिंग चड्ढानंतर रक्षाबंधनवर बहिष्कार टाकण्याचे होतेय मागणी, या कारणामुळे हिंदू एकवटले
अक्षय कुमारसोबत काम का करत नाही? शाहरूख म्हणाला, मी जेव्हा झोपायला जातो तेव्हा तो..
साऊथला मागे टाकण्यासाठी सज्ज आहेत बॉलिवूडचे हे कलाकार, येणार एकामागून एक १८ चित्रपट
बॉलिवूड सोडून राजकारणात जाणार का? अक्षय कुमार म्हणाला, मी