Share

Akshaya Devdhar : Video: मुलगी सासरी जाणार म्हणून ढसाढसा रडले अक्षयाचे बाबा, हळदीच्या मंडपातच…

akshaya deodhar

akshaya devdhar father cryising after seeing daughter video |  तुझ्यात जीव रंगला मालिकेतून पाठकबाई आणि राणा यांची महाराष्ट्राच्या घराघरात एक वेगळी ओळख बनली आहे. मालिकेत पाठकबाईची भूमिका अक्षया देवधरने तर राणा दाची भूमिका हार्दिक जोशीने साकारली होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले असून लवकरच ते लग्न बंधनात अडकणार आहे.

आता त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींनी सुरुवात झाली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी साखरपूडा करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. तेव्हापासून त्यांच्या लग्नाची चाहते वाट पाहत होते. अखेर तो दिवस आला आहे. कारण ते दोघेही लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.

बुधवारी हार्दिकच्या हळदीचा कार्यक्रम पार पडला, तर अक्षयाच्या हातावर मेहंदी रंगली आहे. आज त्या दोघांच्या हळदीचा कार्यक्रम एकत्रच पार पडला आहे. या दरम्यानचे त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. अशात अक्षयाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

अक्षयाच्या या व्हिडिओमध्ये अक्षयाचे बाबा भावूक झालेले दिसत आहे. त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मुलीला हळद लागलेली पाहून तिचे बाबा भावूक झाले आहे. त्याचा हा व्हिडिओ आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये अक्षयाचा हळदीचा कार्यक्रम होताना दिसून येत आहे. त्यासाठी ती तयार झाली असून ती तिच्या बाबांना मिठी मारताना दिसून येते. प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अवघड क्षण असे कॅप्शन अक्षयाने तिच्या या व्हिडिओला दिले आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे.

दरम्यान, अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांच्या हळदीचा कार्यक्रम नुकताच पार पडला आहे. यावेळी हार्दिक जोशी हा पांढऱ्या रंगाच्या कुर्ता आणि पायजमामध्ये होता. तर अक्षया ही पांढऱ्या रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये होती. त्यांचे हळदीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या-
Shikhar dhavan : ‘खाली हात आया था, खाली हात जाना है’; कर्णधारपद काढून घेतल्यानंतर धवनची हताश प्रतिक्रीया
Dinesh Bana : इंडीयाला मिळाला माहीसारखा धडाकेबाज फिनिशर; किपींगही आहे धोनीसारखीच लाजवाब, आकडे पाहून हैराण व्हाल
Rituraj Gaikwad : सेमी फायनलमध्ये आणखी एक शतक करत ऋतुराजने रचला इतिहास

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now