Share

PHOTO: एक लाजरा न साजरा मुखडा…; लाल रंगाच्या साडीत खुलुन आलं पाठकबाईंचं सौंदर्य, चाहते घायाळ

Akshaya Deodhar

झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया देवधर (Akshaya Deodhar). मालिकेतील पाठकबाई अर्थात अंजलीबाई या आपल्या भूमिकेद्वारे तिने प्रेक्षकांकडून भरपूर कौतुक मिळवले होते. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी सोशल मीडियाद्वारे अक्षया चाहत्यांच्या नेहमी संपर्कात राहते. याद्वारे ती अनेक पोस्ट शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते. नुकतीच अक्षयाने तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती साडी लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे.

अक्षयाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अक्षया लाल रंगाच्या साडीला हिरवा आणि गोल्डन रंगाचा बॉर्डर असलेली चंदेरी साडी नेसलेली दिसत आहे. यावर अक्षयाने साजेसे दागिने आणि हलकासा मेकअप केला आहे. या साडीत ती फारच सुंदर दिसत आहे. तर चेहऱ्यावरील तिचे हास्य तिच्या सौंदर्याला चार चाँद लावत आहेत.

फोटो शेअर करत अक्षयाने लिहिले की, ‘ट्रेंडिंगच्या या जगात मला क्लासिक राहायचे आहे’. लाल रंगाच्या साडीतील अक्षयाचे हे फोटो पाहून चाहते मात्र तिच्यावर फिदा झाले आहेत. अक्षयाच्या या फोटोवर कमेंट करत एका चाहत्याने लिहिले की, ‘एक लाजरा न साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं बाई..’. दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, ‘आज एकदम राणा दा झाल्यासारखा वाटतंय मला’. या आणि अशा प्रकारचे अनेक कमेंट करत चाहते तिचे भरभरून कौतुक करत आहेत.

दरम्यान, अक्षयाने २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शाळा’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर २०१६ मध्ये तिला ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत अंजली ही मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या भूमिकेद्वारे तिने यशाचे शिखर गाठले होते. मालिकेतील आपल्या सोज्वळ आणि सहजसुंदर अभिनयाद्वारे तिने प्रेक्षकांची मने जिंकली. मालिकेतील राणा आणि अंजलीच्या जोडीलाही चाहत्यांनी खूप पसंती दिली होती. मालिकेतील राणाचा रांगडा तर अंजलीचा शांत आणि सोज्ज्वळ स्वभाव प्रेक्षकांना खूपच भावला होता.

सोशल मीडियावरही अक्षया नेहमीच सक्रिय असते. तसेच तिच्या फॅनफॉलोअर्सची संख्याही फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर तिला ११ लाखापेक्षा अधिक लोक फॉलो करतात. अक्षयाने कोणतीही पोस्ट शेअर केल्यास चाहते त्यावर लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत तिला उत्साहाने प्रतिसाद देत असतात.

महत्त्वाच्या बातम्या :
‘तेव्हा लोक मला म्हणायचे की, तु हिरोईनसारखी दिसत नाहीस’; माधुरीने जुन्या आठवणींना दिला उजाळा
माधुरी दिक्षीतने सांगितला तिन्ही खानसोबत काम करण्याचा अनुभव, सांगितले प्रत्येकाचे वेगवेगळे गुण
लोकं संतापली! कपिल शर्मा शोवर बहिष्काराची मागणी; ‘हे’ आहे त्यामागचे कश्मीर कनेक्शन

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now