Akshay Kumar: चित्रपट फ्लॉप होताना पाहून अक्षयने घेतला मोठा निर्णय, बाकीच्या कलाकारांचे वाढवले टेंशन

Akshay Kumar, Box Office, Raksha Bandhan/ बॉलीवूडचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करत नाहीत आणि एकापाठोपाठ एक मार खात आहेत. अक्षय कुमारही (Akshay Kumar) या ट्रेंडला बळी पडला आहे. परिणामी त्याने मोठा निर्णय घेतला आहे. आगामी चित्रपटांमध्ये त्याने आपली फी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. एका चित्रपटासाठी 75 कोटी घेणारा अक्षय आता फक्त 9 ते 18 कोटी घेणार आहे.

मात्र ज्या चित्रपटांचा तो निर्माता असणार नाही, त्यांच्या नफ्यात तो 50 टक्के सहभागी असेल. अक्षय ज्या चित्रपटांचा निर्माता आहे त्यातील 80 ते 85 टक्के नफा तो घेतो. यामुळेच पॅडमॅनसारख्या छोट्या बजेटच्या चित्रपटाने 60 कोटींची कमाई केली असली तरी अक्षयला त्याचा मोठा फायदा झाला.

अलीकडेच अक्षय म्हणाला होता की, त्याचे चित्रपट फ्लॉप होण्याची जबाबदारी तो स्वत: घेतो. त्याला असे वाटते की चित्रपट फ्लॉप झाल्याने निर्मात्यांचे खूप नुकसान होते. रक्षाबंधन फ्लॉप झाल्यानंतर त्याने स्पष्टपणे सांगितले की, माझे चित्रपट फ्लॉप होत असतील तर याला कुठेतरी मीही जबाबदार आहे. या सर्व बाबी पाहता त्याने कमी फी घेण्याचा निर्णय घेतल्याचे चित्रपटसृष्टीत बोलले जात आहे.

ट्रेडनुसार अक्षयने प्रत्यक्षात आमिर खानची पद्धत अवलंबली आहे. आमिर चित्रपटात त्याची फी कमी ठेवतो. पण चित्रपटाच्या कमाईत त्याचा मोठा शेअर असतो. यामुळेच आमिरने दिल चाहता है आणि धूम 3 मधून भरपूर कमाई केली कारण ते हिट चित्रपट होते.

अक्षय कुमारने चित्रपट फ्लॉपची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आणि फी कमी केल्यानंतर आता निर्मात्यांच्या नजरा इतर स्टार्सवर लागल्या आहेत. तसेच, अनेक निर्मात्यांनी स्टार्सनी त्यांची फी कमी करावी अशी मागणी करायला सुरुवात केली आहे. स्टार्सची फी इतकी जास्त आहे की पन्नास ते साठ टक्के चित्रपटाचे बजेट त्यात जाते आणि म्हणूनच स्टार्सच्या फीमुळे चित्रपटांचे बजेटही खूप वाढते.

अक्षयच्या फी कपातीच्या बातमीचा परिणाम इतर स्टार्सवरही होणार हे निश्चित. भलेही त्यांना त्यांची फी कमी करणे आवडत नसले तरी टिकून राहण्यासाठी त्यांना त्यांच्या फीच्या अटी बदलाव्या लागतील आणि निर्मात्यांना सहकार्य करावे लागेल. त्यांनाही चित्रपट फ्लॉप झाल्याची जबाबदारी उचलावी लागणार आहे आणि तोट्यात सहभागी व्हावे लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
आव्हाड संतापले! म्हणाले, अक्षय कुमार हा मूर्ख माणूस, पुरंदरेंवरही केले ‘हे’ गंभीर आरोप
जेव्हा अक्षय कुमारने ‘या’ अभिनेत्याला सगळ्यांसमोर फटकारलं, म्हणाला; ‘गप्प राहा, खुप बकवास करतोस’
अक्षय कुमारसोबत काम का करत नाही? शाहरूख म्हणाला, मी जेव्हा झोपायला जातो तेव्हा तो..
बॉलिवूड सोडून राजकारणात जाणार का? अक्षय कुमार म्हणाला, मी…