Bollywood, Ponniyin Selvan, Ranbir Kapoor/ सप्टेंबर महिना सुरू झाला असून या महिन्यात एकापेक्षा एक बिग बजेट सिनेमे रिलीज होणार आहेत. पण या सगळ्यात एक असा चित्रपटही प्रदर्शित होत आहे, ज्यामुळे बॉलिवूडच्या दिग्गजांना पुन्हा एकदा फ्लॉपचा सामना करावा लागू शकतो. वास्तविक, एकीकडे ऐश्वर्या रायचा चित्रपट पोन्नियिन सेल्वन 1 (पोनियिन सेल्वन: I), रणबीर कपूरचा ब्रह्मास्त्र आणि हृतिक रोशन-सैफ अली खानचा विक्रम वेधा हे चित्रपट प्रदर्शित होत आहेत.
तसेच दुसरीकडे हॉलिवूड चित्रपट अवतार देखील प्रदर्शित होत आहे. रिपोर्ट्सनुसार, 2009 मध्ये 1800 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट निर्माते पुन्हा रिलीज करत आहेत. 13 वर्षांनंतर हा चित्रपट 23 सप्टेंबरला पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे जगभरात 20 हजार 368 कोटींचे कलेक्शन होते.
हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, त्याचा दुसरा भाग ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ या वर्षी 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे, ज्याचे बजेट 19 कोटी रुपये आहे. अवतार या चित्रपटासमोर बॉलीवूडच्या दिग्गजांचे चित्रपट टिकून राहतील की साऊथच्या चित्रपटांसमोर जसे हाल झाले तसेच हाल होतील हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये कोणत्या बॉलिवूड दिग्गजांचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत आणि त्यांचे बजेट किती आहे ते जाणून घेणार आहोत.
सतत फ्लॉप होत असलेला अक्षय कुमारचा ‘कटपुतली’ हा चित्रपट 2 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. अक्षयने यावेळी आपला प्लॅन बदलला आहे आणि चित्रपटगृहांऐवजी OTT वर चित्रपट प्रदर्शित करत आहे. या चित्रपटाचे बजेट 100 कोटी आहे.
दिग्दर्शक अयान मुखर्जीचा 300 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ब्रह्मास्त्र हा चित्रपट 9 सप्टेंबरला रिलीज होत आहे. रणबीर कपूर-आलिया भट्टच्या या चित्रपटाला जवळपास 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याच्या रिलीजची अनेक दिवसांपासून चाहत्यांना प्रतीक्षा होती.
सुमारे 40 ते 50 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला सनी देओलचा ‘चूप’ चित्रपट 23 सप्टेंबरला रिलीज होत आहे. या चित्रपटात पूजा भट्ट, दुल्कर सलमान आणि श्रेया धन्वंतरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
तमन्ना भाटियाचा चित्रपट बबली बाउंसर देखील 23 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. मधुर भांडारकरच्या या चित्रपटाचे बजेट जवळपास 70 कोटी आहे.
जेम्स कॅमेरूनचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘अवतार’ पुन्हा एकदा चित्रपटगृहात दाखल होणार आहे. 23 सप्टेंबरला रिलीज होणाऱ्या या चित्रपटाने जगभरात धमाका केला आहे. अवतार 2 या चित्रपटाचा दुसरा भाग 16 डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.
सैफ अली खान आणि हृतिक रोशन स्टारर विक्रम वेधा 30 सप्टेंबरला रिलीज होत आहे. सुमारे 170 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट साऊथ चित्रपट विक्रम वेधाचा रिमेक आहे.
ऐश्वर्या राय बच्चनचा पोन्नयान सेल्वन 1 हा चित्रपट 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. मणिरत्नमच्या मोस्ट अवेटेड चित्रपटाचे बजेट 500 कोटी रुपये आहे. या चित्रपटात बहुतेक साऊथ स्टार्स आहेत.
महत्वाच्या बातम्या-
Waheeda Rehman: बॉलिवूडचा ‘हा’ सुपरस्टार वहिदा रेहमानच्या प्रेमात झाला होता वेडा, कुटुंब अन् करिअरही लावले पणाला
Naseem Banu: बॉलिवूडची पहिली सुपरस्टार अभिनेत्री जिची मुलगी होती टॉपची अभिनेत्री, मुलगाही होता ‘अभिनयाचा सम्राट’
Pushpa: पुष्पा २ साठी अल्लू अर्जुनने घेतलं रश्मिकापेक्षा दहापट मानधन, बॉलिवूड स्टार्सही पडतील फिके