Share

होळीदिवशी बच्चन पांडेने केला फक्त एवढ्या कोटींचा गल्ला, काश्मिर फाईल्सपुढे फिकी पडली अक्षयची जादू

सध्या ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाने बॉक्सऑफीस वरती धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाचा प्रेक्षकवर्ग वाढला आहे. या चित्रपटाने सुपरस्टार प्रभासच्या ‘राधे श्याम’ ला देखील टक्कर दिली आहे. अशातच होळीच्या दिवशी म्हणजेच 18 मार्चला अक्षय कुमारचा चित्रपट ‘बच्चन पांडे’ प्रदर्शित झाला. हा चित्रपट सध्या बॉक्सऑफीसवर विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मीर फाईल्स’ शी सामना करत आहे.

अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ च्या रिलीजची चाहत्यांना खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती, अखेर होळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त कृती सेनन, जॅकलीन फर्नांडिज लीड रोलमध्ये आहेत. तर पंकज त्रिपाठी, अर्शद वारसी हे महत्वाचे स्टार्स देखील आहेत.

‘बच्चन पांडे’ ला लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळेल, आणि बक्कळ कमाई होईल अशी आशा होती. मात्र, सध्या या चित्रपटाला प्रेक्षकांची पहिली पसंद ठरलेल्या ‘द काश्मीर फाईल्स’ शी सामना करावा लागत आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ सध्या सर्व रेकॉर्ड मोडीत काढत आहे.

‘बच्चन पांडे’ कडून पहिल्या कमाईच्या दिवशी चांगला गल्ला जमेल अशी अपेक्षा निर्मात्यांना होती. मात्र, तसं झालं नाही. पहिल्या दिवशी ‘बच्चन पांडे’ नी 13.25 कोटी रुपये कमावले. निर्मात्यांना अपेक्षा होती की, पहिल्या दिवशी 15 कोटींपेक्षा जास्त कमाई होईल. या सगळ्याचे कारण अर्थात ‘द काश्मीर फाईल्स’ ला लोकांनी दिलेला अधिकचा प्रतिसाद आहे.

दुसरीकडे, ट्रेड विश्लेषक सुमित कडेल यांच्या मते, बच्चन बांडेचे अ‍ॅडवान्स बुकींग खूप चांगले झाले होते, तर बच्चन पांडेचे शो मुंबई सर्किट व्यतिरिक्त दिल्ली-एनसीआरमध्ये अनेक ठिकाणी हाऊसफुल्ल झाले होते. सुमित कडेल यांच्या मते या चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई 13 ते 14 कोटींच्या घरात आहे.

सुमित कडेल असेही म्हणतात की, ‘बच्चन पांडे’ च्या कमाईवर ‘द काश्मीर फाइल्स’ चा नक्कीच परिणाम झाला आहे हे सत्य नाकारता येणार नाही. लक्षणीय बाब म्हणजे बच्चन पांडेची अ‍ॅडवान्स बुकींग 13 मार्च पासून सुरू झाली होती. सर्वात आधी अक्षय कुमार त्याच्या दोन्ही अभिनेत्रींना घेऊन थिएटरच्या खिडकीवर बच्चन पांडेची तिकिट खरेदी करण्यासाठी देखील पोहचला होता.

इतर

Join WhatsApp

Join Now