अक्षय कुमारचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘सम्राट पृथ्वीराज'(Samrat Prithviraj) 3 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाची आगाऊ बुकिंगही सुरू झाली आहे. वृत्तानुसार, अॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाची सुमारे 20 लाख तिकिटे विकली गेली आहेत. तिकीट विक्री पाहता, चित्रपट पहिल्याच दिवशी चांगली कमाई करू शकतो, असा विश्वास ट्रेड एनालिस्ट्सने व्यक्त केला आहे.(akshay-kumars-so-many-lakh-tickets-sold-in-emperor-prithvirajs-advance-booking)
कार्तिक आर्यनचा(Kartik Aaryan) चित्रपट भूल भुलैया 2 सध्या चित्रपटगृहात आपले वर्चस्व गाजवत आहे. ब-याच काळानंतर ‘भूल भुलैया 2’ हा असा चित्रपट आहे ज्याने बॉलिवूडच्या आशा उंचावल्या आहेत. अक्षयचा शेवटचा चित्रपट बच्चन पांडे रिलीज झाला होता, जो बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. चित्रपटाच्या अपयशामुळे अक्षयही नाराज झाला होता.
यशराज फिल्म्स आणि दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाकडून निर्मात्यांना खूप आशा आहेत. शनिवारपासून सुरू झालेल्या अॅडव्हान्स बुकिंगचे(Advance booking) आकडे पाहता हा चित्रपट यापूर्वी सुमारे 10 ते 15 कोटींची कमाई करू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.
अॅडव्हान्स बुकिंगची माहिती स्वतः अक्षय कुमारने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर केली आहे. या चित्रपटात अक्षयसोबत(Akshay Kumar) मानशी छिल्लर, संजय दत्त, सोनी सूद, साक्षी तवंर हे मुख्य भूमिकेत आहेत. नुकतेच करणी सेनेच्या विरोधानंतर चित्रपटाचे नाव बदलून सम्राट पृथ्वीराज असे करण्यात आले.
मीडियामध्ये सुरू असलेल्या बातम्यांनुसार, चित्रपटाचे बजेट जवळपास 300 कोटी आहे. या चित्रपटाचा बराच भाग राजस्थानमध्ये शूट करण्यात आल्याचे बोलले जात आहे. सुमारे 35 कोटी रुपयांचा सेट येथे शूटिंगसाठी तयार करण्यात आला होता. याशिवाय मुंबईतील विविध ठिकाणी सेटही तयार करण्यात आले होते.
चित्रपटाला भव्य स्वरूप देण्यासाठी निर्मात्यांनी पाण्यासारखे पैसे ओतले. रिपोर्ट्सनुसार, अक्षयने या चित्रपटात काम करण्यासाठी जवळपास 60 कोटी रुपये फी घेतली आहे. अक्षयच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो OMG 2, रक्षाबंधन, गोरखा, राम सेतू, सेल्फी, सिंड्रेला यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तो टायगर श्रॉफसोबत बडे मियाँ छोटे मियाँ हा चित्रपटही करत आहे.