Share

‘पृथ्वीराज’साठी अक्षय कुमारने घेतली संजय दत्तपेक्षा १२ पट जास्त फी, आकडा वाचून अवाक व्हाल

पृथ्वीराज‘ (Prithviraj) चित्रपटाच्या ट्रेलरची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार (Akshay Kumar) सम्राट पृथ्वीराज चौहानची भूमिका साकारताना दिसणार असून, मानुषी छिल्लर (Manushi Chillar) ही देखील चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. ट्रेलरची भव्यता पाहून हा चित्रपट मोठ्या बजेटमध्ये बनवण्यात आला असल्याचे स्पष्ट होत आहे.(akshay-kumars-fee-for-prithviraj-is-12-times-higher-than-sanjay-dutt)

चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित पृथ्वीराज चित्रपटात या दोन स्टार्सशिवाय संजय दत्त, सोनू सूद, आशुतोष राणा, साक्षी तन्वर, मानव विज आणि ललित तिवारी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.  हा चित्रपट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित ‘पृथ्वीराज रासो’ या ब्रज भाषा महाकाव्यावर आधारित आहे. चित्रपटाबद्दलच्या चर्चांना उधाण येत असतानाच आज आपण संपूर्ण स्टार कास्टने आकारलेल्या फीबद्दल जाणून घेऊ.

पृथ्वीराज

अक्षय कुमार
अक्षय कुमारने त्याच्या कारकिर्दीत अनेक भूमिका साकारल्या आहेत, परंतु पृथ्वीराज चौहानची भूमिका बॉलिवूडच्या सुपरस्टारसाठी पूर्णपणे नवीन असेल. रिपोर्ट्सनुसार, या महान सम्राटाची भूमिका करण्यासाठी अभिनेत्याने जवळपास 60 कोटी रुपये घेतले आहेत.

पृथ्वीराज

मानुषी छिल्लर
2017 मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकल्यापासून मानुषी अनेकवेळा चर्चेसाठी केंद्रबिंदू होती. पृथ्वीराज चौहान यांच्या पत्नी संयोगिता यांच्या भूमिकेतून ती चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. या अभिनेत्रीने पदार्पणासाठी एक कोटी रुपये घेतले आहेत.

पृथ्वीराज

सोनू सूद
‘पृथ्वीराज’ चित्रपटात अभिनेता सोनू सूद महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. तसेच मागील काही वर्षांच्या सोनू सुद्च्या कामामुळे त्याची फॅन फॉलोइंग जबरदस्त वाढली आहे. सूदने या चित्रपटासाठी जवळपास 3 कोटी रुपये घेतले आहेत.

संजय दत्त

संजय दत्त
ब्लॉकबस्टर पॅन इंडिया ‘केजीएफ चॅप्टर 2’ चित्रपटानंतर संजय दत्त ‘पृथ्वीराज’मध्ये काका कान्हाची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याची उपस्थिती कोणत्याही चित्रपटासाठी पुरेशी आहे, कारण गेल्या काही वर्षांत त्याच्या फॅन फॉलोइंगमध्ये कमालीची वाढ झाली आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्याने 5 कोटी रुपये घेतले असल्याची माहिती आहे.

मानव विज

मानव विज
अक्षय कुमारची भूमिका असलेल्या ‘पृथ्वीराज’मध्ये मानव खलनायक मोहम्मद घोरीच्या भूमिकेत दिसणार आहे. इतर काही चित्रपटांमध्ये काम केलेल्या मानवने या पीरियड ड्रामा चित्रपटासाठी सुमारे 10 लाख रुपये घेतले आहेत.

महत्वाच्या बातम्या-
काश्मिर फाईल्समुळे अक्षय कुमारच्या बच्चन पांडेची लागली वाट, कमावले फक्त एवढे कोटी
काश्मिर फाईल्समुळे अक्षय कुमारच्या बच्चन पांडेची लागली वाट, कमावले फक्त एवढे कोटी
अक्षय कुमारनंतर यशलाही मिळाली पान मसाल्याची करोडोंची ऑफर; पण त्याने घेतला हा निर्णय
द काश्मिर फाईल्सने माझा बच्चन पांडे बुडवला, अक्षय कुमार झाला भावूक

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now