Share

अक्षय कुमारचे बॉडी डबलचे काम करायचा ‘हा’ डायरेक्टर, आता अक्षय त्याच्याच चित्रपटात काम करतो

मागील काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये ॲक्शन चित्रपटाचा बोलबाला सुरू आहे. यामध्ये अनेक ॲक्शननी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. असा एक चित्रपट निर्माता आहे. जो या चित्रपटासाठी ओळखला जातो. त्याने अनेक अभिनेत्यासोबत स्टंट तर केलेच आहेत. मात्र त्याने गाड्यांसोबतही स्टंट केले आहेत. तो चित्रपट निर्माता म्हणजे रोहित शेट्टी होय.

सध्या रोहित शेट्टी हे नाव बॉलिवूडमध्ये सुप्रसिद्ध नाव आहे. खरंतर रोहित शेट्टी आज आपला ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म १४ मार्च १९८३ रोजी मुंबईत झाला. तसेच तो एक यशस्वी निर्मात्यांपैकी एक आहे. रोहित शेट्टीचे प्रत्येक चित्रपट हे सुपरहिट होतातच. इतकेच नव्हे तर प्रत्येक चित्रपटाचा १०० कोटींच्या क्लबमध्ये समावेश होतो.

रोहित शेट्टीने आपल्या कारकिर्दीत हा टप्पा गाठण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. खरंतर त्याने स्टंट परफॉर्मर आणि असिस्टंट म्हणून करिअरची सुरुवात केली. त्याने हे यश मिळवण्यासाठी खूप कष्ट घेतले. आज रोहित मोठ्या कलाकारांचे दिग्दर्शन करतो. एक काळ असा होता की, त्याने कलाकारांच्या बॉडी डबलचे काम केले होते.

खरतर रोहितने याबाबत खूप अगोदरच खुलासा केला होता. त्याने सांगितले होते की, ‘९० च्या दशकात तो एकदा अक्षय कुमारचा बॉडी डबल बनला होता.’ रोहित एकदा ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजसाठी आला होता. अक्षय कुमार, साजिद खान आणि श्रेयस तळपदे या शोचे जज होते. रोहित हा त्याच्या ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टीमसोबत आला होता.

याच दरम्यान शोमध्ये अक्षय कुमारने खुलासा केला होता की, ‘तो रोहितला पहिल्यांदा ‘सुहाग’ चित्रपटाच्या सेटवर भेटला होता.’ तसेच याच दरम्यानचा किस्सा देखील त्याने या शोमध्ये शेअर केले होता.‘सुहाग’ हा चित्रपट १९९४ मध्ये आला होता. त्यावेळी रोहित शेट्टी हा असिस्टंट होता आणि तो अक्षयला सर म्हणून हाक मारायचा.

याच दरम्यान रोहित म्हणाला की, “‘सुहाग’ चित्रपटाच्या वेळी मी अक्षयचा बॉडी डबल होतो. मी त्याच्यासारखं चालायला शिकलो.” त्यानंतर अक्षयच्या सांगण्यावरून रोहितही त्याच्यासारखाच स्टेजवर चालूनही दाखवले. मात्र त्यानंतर रोहित शेट्टीने अथक प्रयत्न करून हे यश मिळवले आहे.

एकेकाळी रोहितने अक्षयच्या बॉडी डबलची भूमिका साकारली होती. तर आता खुद्द रोहित अक्षयला ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात दिग्दर्शित केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अक्षय आणि रोहितचा हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

या चित्रपटाच्या यशाबद्दल बोलताना रोहित म्हणाला की, “मला ही संधी मिळाली यात मी धन्यता मानतो. मी फक्त कठोर परिश्रम केले आहेत, जे प्रत्येकजण करतो. परंतु मला वाटते की, मी भाग्यवान आहे की, मी इतक्या लवकर या ठिकाणी आलो.” तसेच रोहितने अजय देवगण, रणवीर सिंह, शाहरुख खान यांच्यासोबतही चित्रपट केले आहेत.

 

 

 

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now