Share

करीना कपूरने ट्विंकल खन्नासमोर केला मोठा खुलासा, म्हणाली, अक्षय कुमारने सैफ अली खानला माझ्यासोबत..

Akshay Kumar Warned Saif Ali Khan

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि त्याची बेगम करीना कपूर खान सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडपे आहेत. दोघांनी दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर २०१२ साली विवाहबंधनात अडकले. ‘टशन’ या चित्रपटादरम्यान त्या दोघांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली होती. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या इतक्या वर्षानंतर करीना कपूरने एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सैफ अली खानला करीनासोबत डेट करण्यास अक्षयने मनाई केल्याचे तिने म्हटले (Akshay Kumar Warned Saif Ali Khan) आहे.

अक्षय कुमारची पत्नी आणि अभिनेत्री-लेखिका ट्विंकल खन्नाचे ‘ट्विक इंडिया’ नावाचे युट्यूब चॅनल आहे. यावर ती वेगवेगळ्या सेलिब्रिटींच्या मुलाखती घेत असते. नुकतीच तिने करीना कपूरचीही मुलाखत घेतली होती. यावेळी बोलताना करीनाने ‘टशन’ चित्रपटादरम्यानचे अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांच्यातील एक रहस्य सांगितले.

करीना कपूर, सैफ अली खान आणि अक्षय कुमार ‘टशन’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटादरम्यानच करीना आणि सैफ एकमेकांना डेट करत होते. मात्र, करीनाचे म्हणणे आहे की, अक्षय कुमारने त्यावेळी सैफ अली खानला करीना कपूरसोबत डेट न करण्याची चेतावणी दिली होती.

करीनाने चॅट शोमध्ये बोलताना सांगितले की, अक्षय सैफला एका कोपऱ्यात घेऊन गेला आणि त्याने सैफला म्हटले की, कपूर घराण्याच्या मुली खूपच खतरनाक असतात. मी त्यांच्या घराण्याला ओळखतो. त्यामुळे सावध राहा. करीनाने पुढे सांगितले की, मला याबाबत कधीच कळाले नसते. पण सैफसोबत माझे लग्न झाले आणि सैफने ही गोष्ट मला सांगितली.

 

करीनाने यापूर्वी एका मुलाखतीत बोलताना सांगितले होते की, ‘टशन’ चित्रपटादरम्यान जेव्हा मी सैफला भेटले तेव्हा मी त्याच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी मला वाटत होते की, मी माझ्या करिअरमध्ये मागे पडत आहे आणि सैफने माझी मदत केली. ‘टशन’ चित्रपटापूर्वीही मी सैफला अनेकदा भेटले. परंतु, या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मला खूप काही बदल जाणवले. मी त्याच्यावर फिदा झाले होते’.

दरम्यान, करीना कपूर आणि सैफ अली खान २०१२ साली विवाहबंधनात अडकले. दोघांना तैमूर आणि जहांगीर नावाचे दोन मुलेसुद्धा आहेत. सोशल मीडियाद्वारे करीना नेहमी सैफ आणि तिच्या मुलांसोबतचे फोटो चाहत्यांशी शेअर करत असते. तिच्या या फोटोंना चाहत्यांकडूनही फार पसंती दिली जाते.

महत्त्वाच्या बातम्या :
तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राच्या नात्यावर कुटुंबीयांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, लवकरच..
नागिन 6: तेजस्वी प्रकाशच्या नागिन लूकने केला कहर; किलर परफॉर्मन्स पाहून चाहते झाले घायाळ
असे चित्रपट कधीच करणार नाही जे माझी मुलगी आणि पत्नी…, अल्लू अर्जुनच्या या वक्तव्याचं होतंय कौतुक

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now