Share

बच्चन पांडे बनताना अक्षय कुमारची लागायची वाट; तब्बल ‘इतके’ तास लागायचे मेकअप करायला

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांची एक झलक पाहायला चाहते नेहमी वाट पाहत असतात. अनेक कलाकार आहेत ज्यांची फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. तसेच कलाकार चाहत्यांना खूप करण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. तसेच आपल्या अभिनयातून नेहमी चाहत्यांचे मनोरंजन करतात. यामध्ये त्यांच्या अभिनयापासून ते त्यांच्या केशभूषा आणि वेशभूषेपर्यंत सर्वच गोष्टी असतात.

अशामध्ये बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारचा नवीन चित्रपट येणार आहे. अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. हा चित्रपट होळीच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला आणि त्यांच्या आनंद द्विगुणित करायला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवालाने केले आहे. यामध्ये अक्षय कुमारचा बॅड बॉय अवतार सर्वांना पाहावा लागणार आहे.

या पोस्टरवरून असे दिसून येत आहे की, अक्षयचा हा आतापर्यंतच्या सर्वात खतरनाक अवतारात आहे. तसेच या लूकसाठी अक्षयने मेहनत ही तेवढीच घेतली आहे. त्याला या लूकमध्ये येण्यासाठी किती तास लागले माहीत आहे का? तर आम्ही तुम्हाला सांगतो की, अक्षय या पात्रात येण्यासाठी प्रोस्थेटिकच्या मदतीने मेकअप आणि केस करत असे, ज्यासाठी त्याला दररोज २ तास लागायचे.

याचबरोबर चित्रपटाच्या जवळच्या एका सुत्राने सांगितले की, “अक्षयचा रॉ आणि सर्वात वेगळा लूक तयार करण्यासाठी दररोज सुमारे २ तास लागत होते. कारण हा चित्रपट कोविडच्या काळात शूट केला होता. त्यामुळे अक्षयकडे वैनिटीमध्ये एकावेळी फारच कमी लोकांना तिथे उपस्थित राहण्याची परवानगी होती. त्यामुळे प्रत्येकाला आपलं काम वेगळे कराव लागत होते. डोळ्यांसह त्याचे धोकादायक ब्लू-लेन्स दिसणे, खडबडीत दाढी यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली, परंतु अक्षयने या संपूर्ण प्रक्रियेत नेहमीच संयम राखला आहे.”

तसेच आतापर्यंत निर्मात्यांनी अक्षयचे ‘बच्चन पांडे’ या चित्रपटातील भूमिकेचे ३ पोस्टर प्रदर्शित केले आहेत. ज्यामध्ये त्याचा खतरनाक लूकची झलक दिसते. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे. या चित्रपटात क्रिती सेनन, अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, अभिमन्यू सिंग आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्याही भूमिका आहेत.

या चित्रपटाची निर्मिती नाडियादवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंटने केली आहे. तसेच ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट १८ मार्चला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहते खूप उत्सुक आहे. आता हे पाहणे महत्वाचे असेल की, पोस्ट प्रमाणेच हा चित्रपट देखील खतरनाक आहे की नाही?

 

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now