Akshay Kumar, Twinkle Khanna, VIDEO, Social Media/ अक्षय कुमार ( Akshay Kumar ) त्याची दोन मुल आरव आणि निताराला घेऊन खूपच पजेसिव आहे. त्याच्या बिजी वेळापत्रकात, खिलाडी कुमार त्याची पत्नी ट्विंकल खन्ना आणि मुलांसोबत क्वालिटी टाइम घालवण्यासाठी थोडा वेळ काढतो. 25 सप्टेंबरला अक्षयची मुलगी नितारा हिने तिचा 10 वा वाढदिवस साजरा केला. त्याचवेळी, अभिनेत्याने मुलीला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, त्यासोबत त्याने एक गोंडस नोट देखील लिहिली आहे.
अक्षय कुमारने आपल्या ट्विटर हँडलवर नितारासोबत तिच्या 10व्या वाढदिवसानिमित्त एक गोंडस व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये वडील-मुलगी एकमेकांचा हात धरून वाळवंटात चालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करताना अक्षयने लिहिले, “माझा हात पकडण्यापासून ते आता माझी शॉपिंग बॅग पकडण्यापर्यंत, माझी मुलगी खूप वेगाने मोठी होत आहे. आज 10 वर्षांची झाली आहे, या वाढदिवसानिमित्त माझ्या शुभेच्छा. बाबा तुझ्यावर प्रेम करतात.”
https://twitter.com/akshaykumar/status/1573945011560845313?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1573945011560845313%7Ctwgr%5Ef91630fccd9599b07255c3e66a5fe48835d965bc%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fstatic.asianetnews.com%2Ftwitter-iframe%2Fshow.html%3Furl%3Dhttps%3A%2F%2Ftwitter.com%2Fakshaykumar%2Fstatus%2F1573945011560845313%3Fref_src%3Dtwsrc5Etfw
अक्षय नुकताच निताराला एका मनोरंजन उद्यानात (amusement park )घेऊन गेला. तिथेच तिच्यासाठी दोन खेळणी जिंकल्यावर हिरोसारख वाटल. हे सांगताना अक्षय म्हणाला, माझ्या मुलीला काल एका मनोरंजन उद्यानात घेऊन गेलो आणि तिथे एक नाही तर दोन मोठी खेळणी जिंकून दिल्यानंतर तिचे आनंदी स्मितहास्य पाहता, मी हिरो होण्याच्या सर्वात जवळ होतो.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अक्षय कुमार नुकताच कटपुतलीमध्ये रकुल प्रीत सिंग, सरगुन मेहता आणि चंद्रचूर सिंग यांच्यासोबत दिसला होता. हा चित्रपट रतनसन या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. हा चित्रपट डिस्ने + हॉटस्टार वर प्रदर्शित झाला होता.
यानंतर अक्षय जॅकलिन फर्नांडिससोबत राम सेतूमध्ये दिसणार आहे. त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये ओ माय गॉड 2, कॅप्सूल गिल, सोरारई पोटरू ( Oh My God! 2, Capsule Gill, Soorarai Pottru ) यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या-
Akshay Kumar: अक्षय कुमारला होणार अटक? ‘या’ कारणामुळे राम सेतू वादाच्या भोवऱ्यात, टीमला आली नोटीस
Akshay Kumar : पत्नीला सार्वजनिक ठिकाणी काढायला लावली पँटची चैन; ‘या’ ५ घटनांमुळे वादात सापडला अक्षय कुमार
काय सांगता? सासू डिंपल कपाडिया अक्षय कुमारला समजायची गे, लग्नाआधी ठेवली होती ‘ही’ अट