Share

पृथ्वीराज चौहान यांच्याबद्दल ‘ते’ वक्तव्य करणे अक्षय कुमारला पडले महागात; नेटकऱ्यांनी केले ट्रोल

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. हिंदू साम्राज्याचे राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित तो चित्रपट आहे. पृथ्वीराज चित्रपटाबाबत, इतिहासाबाबत अक्षय कुमार काही गोष्टी बोलला आहे, त्याचा तो प्रमोशन करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (akshay kumar, manushi chillar, prutviraj, history, london)

अक्षय कुमार त्या व्हिडिओमध्ये म्हणतो की, पृथ्वीराज चौहान या महान सम्राटाविषयी आपल्या शाळांमध्ये जो इतिहास शिकवला जातो त्यात त्यांच्यावर एक पण धडा नाहीये. तो महान पराक्रमी राजा असून त्याच्या कार्यावर २, ३ परिच्छेद असतात, मुघलांवर मात्र १०० परिच्छेद आढळतात. आपल्या देशावर आक्रमण करणाऱ्या मुघलांवर जास्त इतिहासात लिहीले जाते.

अक्षय कुमारने एका मुलाखतीत पण सांगितले होते की, मी आपल्या शिक्षण मंत्र्यांना ही विनंती करणार आहे की, हे संतुलन साधता येईल का, याचा विचार करावा. आपल्या इतिहास पुस्तकात राजा पृथ्वीराज यांच्याबद्दल दोन तीनच ओळी आहेत पण आक्रमणकर्त्या मुघलांविषयी खूप काही. आपण मुघलांविषयी जाणून घ्यायला हवं, पण आपल्या राजांबद्दल पण माहिती असायला हवी. ते सुद्धा महान होते.

अक्षय कुमार कायम त्याच्या जबरदस्त भूमिकांसाठी चर्चेत असतो. देश प्रेमावर, इतिहासावर येणाऱ्या त्याच्या सिनेमांना लोक मोठी पसंती दर्शवतात. त्याचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई करतात. तो इतर कलाकारांच्या तुलनेत वर्षभरात जास्त चित्रपट करतो. अक्षय कुमार विनोदी, ऐतिहासिक, सामाजिक, प्रेमकथा अशा सर्व प्रकारचे सिनेमे करतो.

अक्षय कुमार त्याच्या फिटनेससाठी, भारदस्त भूमिका निभावण्याच्या शैलीसाठी ओळखला जातो. सर्वाधिक कमाई करणाऱ्या श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत अक्षय कुमार पहिल्या क्रमांकावर आहे. अक्षयचे टॉयलेट एक प्रेमकथा, रुस्तम, केसरी, एअरलिफ्ट, हे सिनेमे सुपरहिट झाले होते. अक्षय कुमारसोबत काम करण्यास सर्व दिग्दर्शक, कलाकार कायम उत्सुक असतात.

अक्षय कुमारच्या पृथ्वीराज या बहुचर्चित सिनेमात त्याच्यासोबत ‘मानुषी चिल्लर’ ही मिस वर्ल्ड बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अक्षय कुमारने पृथ्वीराज सिनेमाबाबत जे म्हटले आहे, त्यामुळे त्याला सोशल मिडियावर खूप ट्रोल केले जात आहे. त्यात एका युजरने म्हणले आहे की, अक्षयला लंडनमध्ये प्रमोशनमधून वेळ मिळाला तर त्यानी पुस्तकं नीट बघावी. सातवीच्या NCRT च्या पुस्तकात राजा पृथ्वीराज यांच्यावर २ पूर्ण धडे आहेत.

महत्वाच्या बातम्या
नशीबवान! ऑनलाईन मागवला सोफा आणि रात्रीत झाली लाखोंची मालकीन; नेमकं काय घडलं? वाचा…
…तर टीम इंडियामध्ये माझी निवड कधीच झाली नसती, धोनीचे मोठे वक्तव्य, चाहतेही झाले भावूक
ब्लाऊज न घालताच बाल्कनीत उभी राहिली ‘ही’ अभिनेत्री, फोटो पाहून चाहतेही झाले थक्क

 

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now