बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यादरम्यान नुकतीच अक्षयबाबत अशा बातम्या समोर आल्या की, अक्षयने ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये जाण्यास नकार दिला (Akshay Kumar Angry On Kapil Sharma) आहे. अक्षयची ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर ती वेगाने व्हायरल झाली.
अक्षय कुमार त्याच्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावत असतो. अशात आता अक्षयने कपिल शर्मा शोमध्ये जाण्यास का नकार दिला, असा प्रश्न प्रत्येकालाच पडला. तर आता अक्षय कपिल शर्मा शोमध्ये न जाण्याचे कारण समोर आले आहे.
हिंदुस्थान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, अक्षय कुमार एका व्हिडिओमुळे कपिल शर्मावर नाराज आहे. त्याचे झाले असे की, काही दिवसांपूर्वी अक्षय त्याच्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये पोहोचला होता. यावेळी त्याच्यासोबत अभिनेत्री सारा अली खान आणि दिग्दर्शक सुद्धा होते. त्यावेळी शोदरम्यान कपिलने अक्षयच्या पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच्या मुलाखतीवरून त्याची मस्करी केली होती.
कपिलने अक्षयला म्हटले होते की, ‘मी तुमची मुलाखत पाहिली आहे. तुम्ही एका मोठ्या राजकारणी व्यक्तीची मुलाखत घेत होता. मी त्यांचे नाव घेत नाही. पण तुम्ही त्यांना एक प्रश्न विचारला होता की, माझ्या ड्रायव्हरचा मुलगा विचारत आहे की, आंबा चोखून खाल्ला जातो की कापून?’ कपिलच्या या वक्तव्यानंतर अक्षय म्हणतो की, ‘खरा माणूस असेल तर नाव घे त्या व्यक्तीची’. अक्षयचे हे बोलणे ऐकून कपिल शर्मा मोदी यांचे नाव घेत नाही पण विषय बदलूया असे म्हणतो. शोमध्ये हे सर्व चेष्टा-मस्करीसारखे सुरु होते. पण आता याच गोष्टीमुळे अक्षय कपिलवर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.
https://youtu.be/E8wHyHWH97c
रिपोर्टनुसार, कपिलच्या या शोनंतर अक्षयने वाहिनीला विनंती केली की, हा व्हिडिओ क्लीप एडिटिंगदरम्यान काढून टाकण्यात यावा. जेणेकरून तो प्रसारित होणार नाही. कारण यामध्ये पंतप्रधान मोदी यांच्यावरून मस्करी करण्यात आली. वाहिनीने तेव्हा अक्षयचे म्हणणे मान्य केले. पण काही काळानंतर तो व्हिडिओ क्लीप व्हायरल झाला. त्यानंतर सोशल मीडियावर अक्षयची चेष्टा केल्याने नेटकरी कपिलचे कौतुक करू लागले. आणि याच गोष्टीचा अक्षयला राग आल्याने तो शोमध्ये येण्यास नकार दिला.
दरम्यान, आता कपिल शर्माचे म्हणणे आहे की, ‘त्याने अक्षयकुमारसोबत बोलून गैरसमज दूर केली आहे. अक्षय त्याच्या मोठ्या भावासारखा असून लवकरच तो कपिल शर्मा शोमध्ये दिसणार आहे. यासंदर्भात कपिलने मंगळवारी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
त्याने ट्विट करत लिहिले की, ‘मित्रांनो, मी अक्षय कुमार आणि माझ्यासंदर्भात माध्यमात आलेल्या सर्व बातम्या वाचलो आहे. मी आताच अक्षय कुमार यांच्यासोबत बोललो आहे. हे सर्व केवळ गैरसमजूती होत्या. आता सर्वकाही ठीक आहे. आणि लवकरच आम्ही सर्वजण मिळून बच्चन पांडे चा एपिसोड शूट करणार आहोत. ते माझ्या मोठ्या भावासारखे आहेत आणि ते कधी माझ्यावर नाराज होऊ शकत नाहीत. धन्यवाद’.
Dear friends,was reading all the news in media about me n Akshay paji, I have jus spoke to paji n sorted all this, it was jus a miss communication, all is well n very soon we r meeting to shoot Bachhan pandey episode. He is my big bro n can never be annoyed with me 😊thank you 🙏
— Kapil Sharma (@KapilSharmaK9) February 8, 2022
महत्त्वाच्या बातम्या :
प्रकृती खालावल्यामुळे अभिनेते अमोल पालेकरांना रुग्णालयात केले दाखल; आता ‘अशी’ आहे अवस्था
महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मैत्रीचा हा किस्सा ऐकून तुम्ही व्हाल भावूक
मैने प्यार कियाच्या सेटवर सलमान लक्ष्मीकांत बेर्डे सोबत एक शब्दही बोलत नसायचा; खरे कारण आले समोर