akola sumit raut married with siister in law radhika | काही लोक समाजाच्या रुढी परंपरा तोडून असे काही करतात, ज्यामुळे समाजासमोर एक नवा आदर्श उभा होतो. आता असाच एक प्रकार अकोल्यातून समोर आला आहे. एका तरुणाने आपल्या भावाच्या निधनानंतर आपल्या वहिणीशी लग्न करत वहिणीला आणि पुतण्याला आधार दिला आहे.
विधवा वहिणीचं आणि पुतण्याचं दु:ख त्याला पाहवत नव्हतं. त्यामुळे समाजाचा विचार न करता त्याने हा निर्णय घेतला आहे. तरुणाने एक पुरोगामी निर्णय घेत आपल्या विधवा वहिणीसोबत सातफेरे घेतले आहे. या निर्णयाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
राधिका राऊत असे त्या महिलेचे नाव आहे. मंगेश राऊत आणि राधिका राऊत यांचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना दोन मुलं झाली त्यांचे वैवाहिक जीवनही खुप चांगले सुरु होते. त्यांचा एक मुलगा पाच वर्षांचा आहे तर मुलगी तीन वर्षांची आहे. विराट आणि अणू अशी त्यांची नावं आहे.
मंगेश हे शेतकरी होते, त्यांनी कर्ज घेतलेले होते. त्यामुळे ते सतत त्या चिंतेत राहायचे. अशात कंटाळलेल्या मंगेश यांनी २३ मार्च २०२२ रोजी स्वत:चा जीव दिला. पण आपली सून विधवा राहावी असे कुटुंबियांना वाटत नव्हतं. त्यामुळे त्यांनी तिचं लग्न लावण्याचा निर्णय घेतला.
अशात दोन मुलं आहे, त्यामुळे मुलांचं जीवनही सुखदायी व्हावं, त्यासाठी दिर सुमित राऊतनेच आपल्या वहिनीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कुटुंबियांनी पण याला होकार दिला आणि हे लग्न पार पडलं. २६ नोव्हेंबरला नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला आहे.
मोठा भाऊ गेल्यानंतर त्याचं कर्ज आता सुमित फेडतोय. भाऊ गेल्यानंतर वहिनीला आणि पुतण्यांना आधार मिळावा, तसेच त्यांच्यावर वाईट वेळ येऊ नये म्हणून सुमितने वहिणीशी लग्न केलं आहे. मुलांना वडिलांचं प्रेम मिळावं यासाठी वहिणीशी लग्न करत सुमितने समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
सुर्यावर अजूनही अन्याय? शानदार फॉर्ममध्ये असतानाही संघातून वगळले; आता दिले ‘हे’ कारण
Eknath Shinde : कोकणात शिंदे गटाला मोठा धक्का! शिंदे गटात गेलेले ‘हे’ नेते अन् कार्यकर्ते पुन्हा ठाकरे गटात सामील
फुटबॉल वर्ल्डकप पाहण्यासाठी कतारला आलेल्या कुटुंबाने स्वीकारला इस्लाम धर्म; मौलवीसोबत साजरी केली खुशी






