Share

Akola : मनात आलं अन् यमराजने परत पाठवलं, अकोल्यात थेट तिरडीवरुनच उठून बसला तरुण

prashant meshre

akola prashant meshre incident | कधी कधी अशा काही घटना घडत असतात, ज्यावर विश्वास ठेवणं खुपच कठीण जातं. जीव गेल्यानंतर माणूस परत जिवंत झाल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. आता असाच एक प्रकार अकोला जिल्ह्यातील विवरा गावातून समोर आला आहे. त्यामुळे संपुर्ण अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

या ठिकाणी डॉक्टरांनी मृत घोषित केलेला तरुण चक्क तिरडीवरुन उठला आहे. प्रशांत मेशरे असे त्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं. त्यामुळे त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु केली गेली होती. पण ज्यावेळी त्याला तिरडीवरुन घेऊन जात होते. त्यावेळी तो उठून बसला.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत मेशरे हा तरुण गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या तरुणाच्या अंगात देव येत असल्याचीही गावामध्ये चर्चा होत होती. तसेच त्याच्यामध्ये दैवी शक्ती असल्याचेही म्हटले जात होते.

खुप आजारी असल्यामुळे प्रशांतची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. पण त्यानंतर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यामुळे त्याला घरी आणण्यात आले. तसेच जेव्हा त्याला तिरडीवरुन अंत्यंसंस्कारासाठी घेऊन जाण्यात येत होते, त्यावेळी तो अचानक उठून बसला. त्यामुळे तिथे असणाऱ्या सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

तिरडी नेत असताना तिरडी अचानक हलू लागली होती. त्यामुळे तिरडी खाली ठेवण्यात आली होती. त्यानंतर तरुण जिवंत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तिरडी उचलून मंदिराजवळ आणण्यात आली. तिथे प्रशांत थेट उठूनच बसला. त्यावेळी त्याला पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.

प्रशांतकडे दैवी शक्ती असल्यामुळे तो मृत्यू झाल्यानंतरही परत उठून बसला, यमराजच्या मनात आल्यामुळे त्याला परत पाठवलं अशी चर्चा गावात रंगली आहे. दरम्यान, प्रशांतला पाहण्यासाठी खुप गर्दी जमा झाली होती. त्यामुळे पोलिसांना बोलावावं लागलं होतं. आता पोलिसांनी प्रशांतला आणि त्याच्या भावाला अटक केली आहे.

महत्वाच्या बातम्या-
Virat Kohli : हे तर भारताचे दोन वाघ आहे…; विराट-सूर्यकुमार यादवची फलंदाजी पाहून चाहते झाले भलतेच खुश
kamal kishor mishra : धक्कादायक! मॉडेलसोबत रोमान्स करत होता ‘हा’ प्रसिद्ध निर्माता, पत्नीने पकडलं तर अंगावर घातली गाडी
IND Vs NED : भारताचा विजयरथ थांबेना! टी २० वर्ल्डकपमध्ये ५६ धावांनी जिंकला नेदरलँड्सविरुद्धचा सामना

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now