Share

Akola : एमआयएम-भाजप युती फसली; फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर 5 नगरसेवकांनी पाठिंबा घेतला मागे, आमदाराला नोटीस

Akola : अकोला आणि अंबरनाथ (Ambernath) नगरपालिकांमध्ये नुकतीच घडलेली भाजप (BJP) आणि एमआयएम (MIM) युती राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा निर्माण करत होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ही युती मान्य नसल्याचे स्पष्ट करताच, स्थानिक नेत्यांकडून युती मागे घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अकोला जिल्ह्यात भाजपच्या नेतृत्वाखालील ‘अकोट विकास मंचा’मध्ये (Akot Vikas Manch) एमआयएम सहभागी झाले होते, पण आता एमआयएमने हे आघाडी सोडल्याचे समोर आले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्षांकडून (BJP State President) अकोट विधानसभा आमदार प्रकाश भरसाखळे (Prakash Bharsakhle) यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे आता एमआयएमचे अकोट नगरपालिकेतील पाच नगरसेवक – रेश्मा परवीन मोहम्मंद अजीम (Reshma Parveen Mohammad Azim), युसुफ खान हादीक खान (Yusuf Khan Hadik Khan), हन्नान शाह सुलतान शाह (Hannan Shah Sultan Shah), दिलशाद बी रज्जाक खाँ (Dilshad B Razzak Khan), अफरीन अंजुम मो. शरीफोद्दीन (Afreen Anjum Mo. Sharifoddin) – यांनी भाजपसमवेतच्या आघाडीला पाठिंबा मागे घेतला आहे.

एमआयएमचे हे पाऊल भाजपकडून स्थापन केलेल्या ‘अकोट विकास मंचा’तून बाहेर पडण्याचे झाले आहे. या आघाडीमध्ये भाजपसोबत दोन्ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), तसेच बच्चू कडूंची प्रहार जनशक्ती पार्टी (Prahar Janshakti Party) सहभागी होती. परंतु मुख्यमंत्री फडणवीसांच्या स्पष्ट निर्देशानंतर आणि पक्षाच्या आदेशानुसार एमआयएमने ही युती सोडल्याचे समोर आले.

भाजपकडून एमआयएमच्या या युतीसंदर्भात कडक कारवाई सुरु करण्यात आली आहे. प्रकाश भरसाखळे (Prakash Bharsakhle) यांना नोटीस बजावून पक्षाच्या निर्णयावर स्पष्टता द्यावी लागणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे की, ‘पक्षाची प्रतिमा मलिन झाली असून, यावर कारवाई न करणे योग्य नाही.’ त्यामुळे आता या युतीसंदर्भात स्थानिक नेते काय उत्तर देतील हे पुढील राजकीय घडामोडींसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now