pune : पुण्यातून एक वेगळी बातमी समोर येतं आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे सध्या देशभरात चांगलीच चर्चेत आली आहे. गुरुवारी एनआयएने देशभरात सर्वत्र छापे टाकले. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्यात हे 10 छापे टाकण्यात आले.
तसेच दहशतवादाला मदत केल्याप्रकरणी एनआयएनं पीएफआयच्या देशभरातील कार्यालयांवर छापे टाकून शंभराहून अधिक लोकांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही आजवरची सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे. यामुळे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना चांगलीच चर्चेत आली आहे.
तर दुसरीकडे, शुक्रवारी म्हणजेच काल पीएफआयवर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ पुण्यातील मुस्लीम समाजातील काही तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चावेळी आक्रमक तरुणांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
यामुळे काहीकाळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आंदोलकांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या. सध्या या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतं आहे.
दरम्यान, पोलीस आयुक्तांकडून एक आवाहन करण्यात आलं आहे. ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा प्रकारच्या कोणत्याही घोषणा देण्यात आल्या नसल्याचं पोलीस आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. अशा प्रकारची अफवा कोणीही पसरवू नये, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घोषणा दिल्या प्रकरणी पुणे पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या ६० ते ७० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. बंडगार्डन पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिजाज जैनुद्दीन सय्यद याच्यासह इतर जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे पुण्यात वातावरण सध्या तणावपूर्ण आहे.
Bank : बँकांची कामे आत्ताच करून घ्या; ऑक्टोबर महिन्यात बँकांना आहेत ‘या’ २१ सुट्ट्या