akhilesh yadav tejswi yadav on mumbai election | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेचे दोन गट पडले आहे. एक म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि दुसरी म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना. एकनाथ शिंदे यांच्याकडे जास्त आमदार खासदार असल्यामुळे आपणच खरी शिवसेना असल्याचा ते दावा करताना दिसून येत असतात.
अशात उद्धव ठाकरे यांची शिवसेना जरी राज्यात सत्तेसाठी संघर्ष करत असली तरी त्यांना विरोधकांकडून पाठबळ मिळत असल्याचे दिसून येत आहे. अंधेरीची पोटनिवडणूक होणार असून तिथे ठाकरे गटाची शिवसेना आणि भाजप यांच्यात कट्टर लढत पाहायला मिळणार आहे.
या निवडणूकीमध्ये शिंदे गटाने भाजपला पाठिंबा दिला आहे. पण शिवसेनेला कायम विरोध करणाऱ्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.
तसेच वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील उद्धव ठाकरेंची हिंदुत्वाची व्याख्या आपल्याला मान्य असल्याचे म्हटले होते. त्यामुळे राजकीय घडामोंडीकडे पाहता उद्धव ठाकरे यांना मिळणार पाठिंबा वाढताना दिसून येत आहे. याचा फायदा मुंबई महापालिका निवडणूकीतही शिवसेनेला होणार आहे.
शिवसेना आणि भाजप यांच्यात मुंबईच्या महापालिकेच्या निवडणूकीत तगडी टक्कर होणार आहे. दोन्ही पक्षांकडून त्यासाठी जोर लावला जात आहे. पण आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला राष्ट्रीय पातळीच्या पक्षांकडूनही पाठिंनही पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जनता दलाचे तेजस्वी यादव आणि समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव हे सुद्धा शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका इतर पक्षांनाही योग्य वाटत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे तेजस्वी यादव आणि अखिलेश यादव हे मुंबईत सभा घेण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
Andheri By-Election : भाजपचा नववी पास उमेदवार निघाला ‘एवढ्या’ कोटींचा मालक, लटकेंकडे किती संपत्ती?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी निवडणूक न लढवताच जिंकली मने; सेनेला पाठिंबा देत फडणवीसांनाही केली ‘ही’ विनंती
Raj Thackeray : मोठी बातमी! अंधेरी पोटनिवडणूक लढवू नका, राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र; लटके बिनविरोध निवडून येणार?