Share

फडणवीसांसाठी ब्राह्मण महासंघ मैदानात! मोदींचा उल्लेख करत केली मोठी मागणी, म्हणाले “मोदींनंतर भाजपात…”

devendra fadanvis

राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगलेच चर्चेत आले आहेत. सध्या भाजपाने संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीत स्थान दिल्याने फडणवीस चर्चेत आहेत.  फडणवीस हे केंद्रीय राजकारणात सक्रीय होतील, अशा चर्चा आता रंगत आहेत.

याचबरोबर भाजपाने फडणवीस यांचं महत्त्व अधोरेखित केलं असून, त्यांच्यासाठी राष्ट्रीय राजकारणाचे दरवाजे खुले केले असल्याची चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे ब्राह्मण महासंघाने एक मोठी मागणी केली आहे. फडणवीसांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्या, असं ब्राह्मण महासंघाने म्हंटलं आहे.

या आशयाच पत्र ब्राह्मण महासंघाने थेट भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांना दिलं आहे. ब्राह्मण महासंघाने भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांना पत्र लिहिलं असून देवेंद्र फडणवीसांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्या अशी मागणी केली आहे. यामुळे आता भाजपकडून या प्रतिक्रिया येतीये हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वाचा नेमकं पत्रात काय म्हंटलं आहे?
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी (Govind Kulkarni) यांनी भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांना एक पत्र लिहिले आहे. फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या, अशी मागणी कुलकर्णी यांनी या पत्राद्वारे केली आहे.

या पत्रात कुलकर्णी यांनी म्हंटलं आहे की, ‘गेल्या ५ वर्षांत फडणवीसांनी आपली परिपक्वता सिद्ध करुन दाखवली आहे. ब्राह्मण महासंघ कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही. पण, राष्ट्रहिताला प्राधान्य देते, म्हणूनच फडणवीस हे नरेंद्र मोदींनंतर भाजपच्या वैभवशाली नेतृत्त्वाची परंपरा कायम ठेवतील.’

दरम्यान, फडणवीस हे भाजपचे भविष्य असून मोदी यांच्यानंतर सक्षम नेतृत्वाची चर्चा होते, त्यात देवेंद्र यांचे नाव अग्रभागी असते. मात्र एक महिन्यापूर्वी त्यांना उपमुख्यमंत्रीपद घेण्यास भाग पाडण्यात आले. त्यामुळे एक पाऊल जरी मागे यावे लागले असले तरी हा प्रारंभ आहे. हा निर्णय भाजपाचा योग्य निर्णय असू शकतो, असं कुलकर्णी यांनी पत्रात म्हंटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
Bollywood: सलमान खानची अभिनेत्री ईडीच्या जाळ्यात; तब्बल २०० कोटींच्या घोटाळ्यात ईडीने केले आरोपी
Bollywood: फ्लॉप होणाऱ्या चित्रपटांवर तब्बूची विचित्र प्रतिक्रिया, म्हणाली, कलाकारांनी टेंशन घेऊ नका कारण..
ठाकरेंजवळचा आणखी एक आमदार शिंदे गटाच्या वाटेवर, उदय सामंतांच ‘ते’ वक्तव्य खरं ठरणार
Raigad : श्रीवर्धनमध्ये बोटीत आढळल्या एके-४७, दहिहांडीच्या आधीच महाराष्ट्रात अलर्ट, वाचा सविस्तर..

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now