Share

भारताकडून हरल्यानंतर पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममधील ‘तो’ व्हिडिओ तुफान व्हायरल

babr azam

टी – 20 विश्वचषकात पाकिस्तानच्या पदरी निराशा आली. भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी करत पाकिस्तानला आसमान दाखविले. अवघ्या भारताने भारतीय क्रिकेट संघावर कौतुकाचा वर्षाव केला. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध नागरिकांनी आनंद व्यक्त केला. एवढंच नाहीतर, राजकीय नेत्यांनी देखील आनंद व्यक्त केला.

कालच्या मॅचची चौकाचौकात आजही चर्चा सुरू आहे. रविवारी टी २० वर्ल्डकपमधला भारताचा पहिला सामना पार पडला. हा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होता. या सामन्यात भारतीय संघाने ४ विकेट्सने विजय मिळवला आहे. हा सामना खुपच थरारक झाला होता.

विराटच्या जबरदस्त खेळीमुळे भारतीय संघाला हा सामना जिंकता आला. तर आता पाकिस्तानमध्ये निराशाचे वातावरण निर्माण झाले आहे. संघातील नाराजी आता एका व्हिडिओमधून समोर आली आहे. अशातच आता ड्रेसिंग रुममधील एक व्हिडीओ समोर आला आहे.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे की, पाकिस्तानच्या संघात नाराजीचा सुर निर्माण झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, पाकिस्तान संघाचे मुख्य कोच मॅथ्यू हेडन आणि बाबर आझम हे संघाला प्रोत्साहन देतं असल्याचं पाहायला मिळत आहे.

 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हा व्हिडिओ शेअर केला आहे. बाबर आझम संघाला प्रोत्साहन देताना सांगत आहेत की, ‘आपण पूर्ण प्रयत्न केले आणि काही चूकाही केल्या आहेत त्या आपल्याला आता सराव करून सुधारायच्या आहेत. या पराभवाने खचून जाऊ नका, अजून काही मोठे सामने होणार असल्याच त्यांनी सांगितलं आहे.

पुढे बाबर आझम यांनी सांगितलं आहे की, ‘एका खेळाडूमुळे नव्हे तर आपण एक पूर्ण संघ म्हणून हरलो आहोत. त्यामुळे कोणीही कोणत्या खेळाडूवर याच खापर फोडू नका, असं बाबर आझम यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. आपण चांगला खेळ केला असून येणाऱ्या सामन्यांमध्ये आणखी चांगलं प्रदर्शन करायचं असल्याचंही बाबर आझम म्हणाला.

महत्वाच्या बातम्या-
सनी देओलच्या मुलाचा झाला गुपचूप साखरपुडा; काय आहे नेमकं यामागील कारण वाचा
Sunny Deol: सनी देओलच्या ‘चुप’ने बाकीच्या चित्रपटांना केलं ‘चिडीचुप’ पहिल्याच दिवशी केली विक्रमी कमाई
Sunny Deol: राहायला नव्हते घर, उपाशीपोटी काढले दिवस, अजूनही मला.. सनी देओलच्या अभिनेत्रीची कहाणी ऐकून डोळ्यातून पाणी येईल

इतर खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now