Share

करोडपती कुटुंबातील महिला संपत्तीसाठी आमनेसामने, गटारात लोळून मारामारी; पहा व्हिडीओ

crime

अलीकडे यशाचा शॉर्टकट मार्ग सोधून पैसे मिळवण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. संपत्तीसाठी कुटुंबातील वाद कोर्टापर्यंत पोहचले आहेत. जमिनीच्या तुकड्यासाठी सख्खे भाऊ पक्के वैरी झाले आहेत. हे सांगण्याच कारण म्हणजे, असच एक धक्कादायक प्रकरण आता समोर आलं आहे.

करोडपती कुटुंबातील महिला संपत्तीसाठी आमनेसामने आल्या आहेत. त्या डॉन महिलांमध्ये मारहाण देखील झाली. यात त्या दोघी जखमी देखील झाल्या. अखेर हे प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत पोहचले. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

वाचा संपूर्ण प्रकरण… हे प्रकरण राजस्थानमधील अजमेरमध्ये घडलं आहे. या घटणेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी हे प्रकरण घडलं आहे. टाटगड रोडवर असलेल्या नायरा पेट्रोल पंपावर मालमत्तेच्या वादातून दोन्ही कुटुंब समोरासमोर आले. यावेळी दोन्ही कुटुंबातील महिला आक्रमक झाल्या.

दोन्ही महिलांमध्ये कडक्याची भांडण झाली. ही हाणामारी एवढी टोकाला गेली की, दोन्हीही महिला पेट्रोल पंपाच्या बाहेरून जाणाऱ्या नाल्यात पडल्या. त्या एवढ्या आक्रमक झाल्या होत्या की, नाल्यात पडल्यावर देखील त्या केस पकडून भांडत होत्या. नागरिक देखील घटनास्थळी जमा झाले.

https://twitter.com/zahacktanvir/status/1537730550831763456?s=20&t=VDHH9AVP9KWEcL5-CNyIKg

दरम्यान, या प्रकरणाने परिसरात देखील खळबळ उडाली आहे. या घटनेत दोन्ही महिला जखमी झाल्या आहेत. हे प्रकरण थेट पोलिस स्टेशनपर्यंत गेलं आहे. दोन्ही बाजूंकडून एकमेकांविरुद्ध तक्रारी करण्यात आल्या आहेत. पोलिस आता या प्रकरणी कसून तपास करत आहेत.

याबाबत शहर पोलीस अधिकारी सुरेंद्र सिंह जोधा यांनी माहिती दिली आहे. याबाबत सांगताना जोधा यांनी म्हंटलं आहे की, ‘नायरा पेट्रोल पंपाचे मालक नरेंद्र कुमार आर्य आणि त्यांच्या कुटुंबातील एक मुलगी संगीता कुमावत यांच्यात मालमत्तेवरून वाद आहे.’ याच कारणावरून महिलांमध्ये हा वाद झाल्याने हा प्रकार घडला.

महत्वाच्या बातम्या
उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला आणि गोळीबार; अग्नीपथ योजनेविरोधातील आंदोलन पेटले
‘राष्ट्रपती पदासाठी उंची आणि बौद्धिक पातळी आवश्यक आहे’, सदावर्तेंचा शरद पवारांना टोला
अजय देवगण सोबत झळकलेल्या अभिनेत्रीवर आली भयंकर वाईट वेळ, चेहऱ्यातून काढल्या होत्या ६७ काचा

इतर क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now