Share

Ajit Pawar : अजितदादांचा एकनाथ शिंदेंना भेदक सवाल; भर विधानसभेत मुख्यमंत्र्यांची बोलतीच बंद

ajit pawar and cm shinde 3

Ajit Pawar: आपल्या रोखठोक शैलीसाठी आणि कामाच्या वेगासाठी ओळखले जाणारे विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धारेवर धरले.’नगरविकास मंत्री होता, तेव्हा जनतेतून थेट नगराध्यक्ष, सरपंच निवडीला तुमचा विरोध होता. मात्र आता मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही तोच निर्णय कसा काय बदललात?’

असा रोखठोक सवाल अजितदादांनी विद्यमान मुख्यमंत्र्यांना विचारला. आज विधानसभेत जनतेतून नगराध्यक्ष, सरपंच निवडीबाबत चर्चा झाली. त्यास अजित पवारांनी विरोध दर्शवला आहे. मात्र एकनाथ शिंदे पूर्वी या निर्णयाविरोधात होते. आणि आता मात्र त्यांनीच असा निर्णय घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या भूमिका बदलाबाबत मोठी चर्चा रंगली आहे.

अजित पवार या संदर्भात बोलताना म्हणाले, ‘विलासराव देशमुखांच्या लातूरमध्ये राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष निवडून आला होता. मात्र तिथे काँग्रेसचे बहुसंख्य नगरसेवक होते. त्यामुळे या ठिकाणी लोकांच्या हिताचे नसणारे, लोकशाहीला घातकच निर्णय घेतले जात होते.

अशी परिस्थिती बरोबर नसल्याने ही सिस्टीम राबवू नये,’ असं अजित पवार म्हणाले. ‘फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी ही सिस्टीम चालू केली. मग आता मुख्यमंत्री पण थेट जनतेतून निवडून आणा. नगराध्यक्ष, सरपंच जनतेतून निवडून आणायचा. आणि मुख्यमंत्री निवडून आलेल्या आमदारांमधून एक, हे कसे चालेल?’

असा उलट प्रश्न अजित पवारांनी सरकारला विचारला. पुढे ते म्हणाले की, ‘महानगरपालिकेत अनेक नगरसेवक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असतात. भरपूर पैसे आणि मसल पॉवरच्या जोरावर ते जिंकतात मग गरिबांनी काय करायचे?’

‘यामुळे फक्त दादागिरी आणि गुन्हेगारी वाढत जाईल. त्यामुळे कृपया ही सिस्टीम राबवू नये, लोकांतून नगराध्यक्ष निवडून आणायचे विधेयक सरकारने मागे घ्यावे,’ अशी मागणी अजित पवारांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; उद्धव ठाकरेंना मात्र मोठा दिलासा
Nitish Kumar: दलबदलू मुख्यमंत्र्यांवर जनता संतापली; ताफ्यावर तुफान दगडफेक, ४ गाड्या फोडल्या
‘हॉटेल बंद का म्हणून पाहायला गेले, दार उघडलं, अन्…,’ समोरील दृश्य पाहून पोलीसही चक्रावले

 

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now