जवळपास पाच महिन्यापासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा शासकीय सेवेत समावून घ्यावे, या न्याय मागणीसाठी संप सुरू आहे. या संपाला २५१ दिवस होत आहेत. या १५१ दिवसात एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीला अजूनही न्याय मिळाला नाही.
तसेच न्यायालयाच्या आदेशानंतर तयार झालेल्या तीन सदस्यीय समितीच्या अहवालानंतर राज्य सरकारनं विलिनीकरणाविषयी आपली भूमिका सादर करत कर्मचाऱ्यांची मागणी फेटाळली आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम दिला आहे.
माध्यमांशी बोलताना अजितदादा यांनी एसटी कर्मचार्यांना पुन्हा कामवर रुजू होण्याचे आवाहन केले आहे. “३१ मार्चपर्यंत कुणाचं न ऐकता एसटीत रुजू व्हा. तसेच आपलं आपलं काम सुरू करा. ३१ मार्चपर्यंत नाही ऐकलं तर स्पष्ट सांगतो जे येणार नाही, त्यांच्याबद्दल कठोर भूमिका घेतली जाईल. मग मात्र त्यांना वेगळी संधी मिळणार नाही” असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
याबाबत ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु आहेत, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी ३१ मार्चपर्यंत कामावर रुजू व्हा. याचबरोबर यावेळी बोलताना अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार दिला जाईल असं आश्वासनही दिलं.
दरम्यान, काल परिवहन मंत्री अनिल परब यांनी सभागृहात याबाबत माहिती दिली आहे. कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचारी कामावर आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्याबाबत चर्चा करण्याची ग्वाही अनिल परब यांनी दिली. तसेच कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेत दिले जाणार असून त्याची जबाबादारी राज्य सरकारने घेतली असल्याचे परब म्हणाले.
तसेच याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या या संपाबाबत दिवशी दोन्ही सभागृहात निवेदन केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात राज्य सरकारने वेळोवेळी बैठका घेऊन संपाची दखल घेत कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
चेन्नईचा कर्णधार जडेजाबद्दल माजी क्रिकेटरचे धक्कादायक वक्तव्य; म्हणाले, जडेजा चांगला क्रिकेटर पण तो…
केकेआरविरुद्धच्या सामन्यात धोनी बनवणार ‘हा’ मोठा विक्रम; होऊ शकतो विराट, रोहितच्या लिस्टमध्ये सामील
नराधम कुटुंबीयांनीच लुटली अल्पवयीन मुलीची अब्रु; वडील, मामाने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन..
27 रुपयांच्या या शेअरने दिला आश्चर्यकारक परतावा, 1 लाखाचे झाले 87 लाख, गुंतवणूकदार मालामाल