महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ झाली. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे विद्यमान सरकार कोसळले. यामागे त्या आमदारांनी राष्ट्रवादीवर अनेक आरोप केले. आता त्यावर माविआ सरकारमध्ये असणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा दावा केला आहे.(Ajit Pawar will worship Panduranga as Chief Minister this coming Kartiki Ekadashi”)
‘राज्यात मध्यावर्ती निवडणुका लागल्या तर येत्या कार्तिकी एकादशीला अजित पवार मुख्यमंत्री म्हणून पांडुरंगाची पूजा करतील,’ असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादीचे अकोल्याचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने सायकल रॅली आयोजित केली होती. पुणे ते बारामती असणारी ही सायकल रॅली अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आली. या रॅलीचा बक्षीस वितरण समारंभ विद्या प्रतिष्ठान बारामती येथे झाला. त्याप्रसंगी अमोल मिटकरी बोलत होते.
‘दोन मंत्र्यांचे हे सरकार लवकरच पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल येणे बाकी आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा कायद्याची चांगले अभ्यासक आहेत. कोर्टाचा निकाल येईन आणि हे सरकार कोसळेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
‘हे सरकार पडणार आहे. औटघटकेचं हे सरकार असल्यामुळेच इतके दिवस उलटून गेले, तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, असेही मिटकरी म्हणाले. पुढे ते म्हणाले, हे सरकार कोसळल्यावर मध्यावधी निवडणुका लागल्या तर राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स चांगला असेल.’
आमदार मिटकरींनी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात कार्तिकी एकादशीला मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्याच हस्ते पांडुरंगाची पूजा होईल, असा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यामुळे माझ्यात लढण्याची हिंमत आली; आदित्य ठाकरेंची भर सभेत कबुली
मला फसवून शिंदे गटात नेले, पुन्हा पक्षात घ्या; पुण्यातील बड्या शिवसेना नेत्याचे उद्धव ठाकरेंना पत्र
Hot Summer: कडक उन्हामुळे ‘येथे’ ट्रेन चालवणेही झालंय कठीण, रेल्वेचे रुळही वितळले, वाचून हादराल