Share

कुत्र्याला घरात काय गादीवर घेऊन झोपा, आमचं काही म्हणणं नाही, पण..; अजितदादा पुणेकरांवर भडकले

ajit pawar

राज्याच्या राजकारणात आक्रमक आणि रोखठोक नेते म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ओळख आहे. आज अजित पवार यांनी तळजाई टेकडीवरील वन उद्यानातील विकासकामांचं उद्घाटन केलं. यावेळी बोलताना अजित पवार यांनी टेकडीवर असलेल्या घाणीवरून पुणेकरांवर शाब्दिक निशाणा साधला. (ajit pawar taunts punekar over from dirt on taljai hill)

यावेळी वन खात्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. कार्यक्रमाची वेळ सकाळी सातची असताना अजित पवार पावणे सात वाजताच दाखल झाले. यावेळी त्यांनी उद्यानाची पाहणी केली तसेच तळजाई वर फिरायला येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर झालेल्या भाषणात अजितदादांनी पुणेकरांना फटकारले.

तळजाई परिसरात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. याचाच धागा पकडून अजित पवार म्हणाले, ‘इथं पाळीव कुत्री घेऊन येऊ नका, कुत्र्याला तुम्हाला घरात काय गादीवर जवळ घेऊन झोपायच ते झोपा. आमचं काही म्हणणं नाही. पण इथं कुत्र्यांमुळ प्रश्न निर्माण होतोय, असे रोखठोक मत त्यांनी मांडले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, काही लोकं तळजाईला येताना श्वानांना घेऊन येतात. मात्र तसं त्यांनी करू नये. काय लाड करायचे आहेत तर ते घरी करा. कुत्र्यांना घरी झोपवा. नाहीतर मी इथे बिबटे सोडले असते. मात्र मला नागरिकांची काळजी आहे, असं म्हणत पवारांनी कोपरखळी मारली.

तसेच तळजाई टेकडीवर कचऱ्याच्या साम्राज्य वाढत असताना, नागरिक कुठेही कचरा टाकत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. नागरिकांची ही कृती योग्य नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. याचबरोबर पुण्यात मोठ्या प्रमाणात काँक्रेटचे जंगल तयार व्हायला लागलं आहे. तरी सुदैवाने पुण्यात वन विभाग, सरंक्षण खात यांच्या मोठया जागा आहेत. तिथं हिरवाई राहिली पाहिजे असे आमचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, भाजपाकडून सरकार पाडण्याच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, ‘गेल्या सव्वा दोन वर्षापासून भाजपाकडून ही वक्तव्ये केली जात आहे. जोपर्यंत १४५ची मॅजिक फिगर उद्धव ठाकरेंच्या पाठिशी आहे आणि जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे तीन पक्ष एकत्र आहे, तोपर्यंत हे सरकार चालणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.’

महत्त्वाच्या बातम्या
जीवघेणी मिठी! छातीला स्फोटकं बांधून बायकोला मारली मिठी; कारण वाचून पायाखालची जमीन सरकेल
‘या’ गावात घरोघरी पाळले जातात विषारी साप; सापांसोबत खेळतात मुलं, कारण वाचून आश्चर्य वाटेल
“आमचं बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका, हिजाब आणि भगव्यावरुन…”, भारतीय जवानाचा शेवटचा मेसेज व्हायरल
परीक्षेत कॉपी केली म्हणून मैत्रिणींसमोर वडिलांनी झाप झाप झापलं; 13 वर्षीय मुलीने उचलले टोकाचे पाऊल..

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now