ajit pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार त्यांच्या रोखठोक बोलण्याच्या शैलीसाठी ओळखले जातात. त्यांच्या धारदार शब्दांनी, सत्ताधारी सुद्धा गार होताना अनेकांनी सभागृहात पाहिले आहे. अजित पवार त्यांच्या कामाच्या वेगामुळे आणि धारदार वक्तव्यांमुळे कायमच राजकीय वर्तुळात चर्चेत असतात. अशाच प्रकारचे एक वक्तव्य आता त्यांनी केले आहे.
अजित पवारांनी नाव न घेता थेट पंतप्रधान मोदींना टोला लगावल्याचे दिसते. बारामती दौऱ्यावर असणाऱ्या अजित पवार यांनी बारामतीतील सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. तेव्हा ते म्हणाले की, ‘मी आईला भेटायला येतो पण फोटो काढत नाही.’
अशाप्रकारे पंतप्रधान मोदींवर त्यांनी टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या कानपिचक्या घेण्याची एकही संधी अजित पवार सोडत नाहीत, हेच यावरून दिसते. अजित पवार पुढे बोलताना म्हणाले, मलाही काठेवाडीवरून मुंबईला पाठवलं. गेलो ना.. मुंबईला राहतोय ना.. तिथं पण, मी कधी म्हणलो का? मला तिथेच राहायचंय, मला तिथे राहायचं.’
‘आईला भेटायला मी इकडे येतो आणि भेटून जातो. पण फोटो कधी काढत नाही. आताही दौरा संपल्यावर निवांतपणे मी आईची भेट घेणार आहे,’ असं अजित पवार यांनी सांगितलं. अजित पवारांच्या या वक्तव्यावर भाजपकडून कोणती प्रतिक्रिया येते हे पहावे लागेल.
भाजपकडून बारामती येत्या निवडणुकीत काबीज करण्यासाठी मोठे प्लॅनिंग केले जात आहे. त्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवस आधी बारामती दौरा केला. या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा देखील आता बारामती दौरा होत आहे. बारामती हा पवारांचा बालेकिल्ला आहे. त्याला कायम अखंड ठेवण्याचे प्रयत्न पवारांकडून कायम होणार हे निश्चित.
अजित पवारांनी बारामतीत बोलताना देवेंद्र फडणवीसांवर देखील निशाणा साधला. सहा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, इथं एक जिल्हा सांभाळताना मला नाकी नऊ आलं. तिथं सहा जिल्हे कसं काय कोण सांभाळणार?, पण तरी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
Congress party : अखेर ठरलं! ‘या’ दोन तुल्यबळ नेत्यांमध्ये होणार काॅंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक, गांधी कुटुंब कुणाच्या बाजूने?
shivsena : ‘सरकारमध्ये असताना आम्ही षंढ झालो, म्हणून…’, सुहास कांदेंचं खळबळजनक विधान
udhav thackeray : एखादी मुलगी लग्न झाल्यानंतर सासरी जाते तसं सोंग उद्धव ठाकरेंनी वर्षा सोडताना केलं; शिंदे गटाने केला हल्लाबोल