Share

Ajit pawar : ..त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार, अजित पवारांच्या दाव्याने उडाली खळबळ

devendra fadanvis ajit pawar

Ajit pawar | राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, शिंदे सरकार लवकरच पडणार आहे. त्यांनी दावा  केला की, राष्ट्रवादी पक्ष फुटणार नाही उलट शिंदे सरकार पडेल.

शिंदे-फडणवीस सरकार पडणार असे भाकित अजित पवार आणि जयंत पाटील यांनी केल्यानंतर चर्चांना उधाण आले आहे. ते म्हणाले की, शिर्डीतील राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर शिंदे सरकार पडेल. असं बोललं जात होतं की, १६ आमदारांच्या पात्रतेच्या मुद्द्यावरून हे सरकार पडेल पण आता राष्ट्रवादीनेच शिंदे सरकार पडेल असा दावा केला आहे.

१४५ चा आकडा कमी झाला की, सरकार पडणार असं अजित पवार म्हणाले. अजित पवार असंही म्हणाले की, शिंदे गटातील कोणी आमदार आमच्या संपर्कात नाही. पण नऊ दहा आमदार आमच्यासोबत बोलत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर आम्ही भूमिका घेणार आहोत. तेवढा संयम ते बाळगत आहेत हेच विशेष आहे असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, शिंदे गट आणि भाजपकडून दावा केला जात आहे की, हे सरकार १५ वर्षे टिकेल. पण दुसरीकडे अपक्ष आमदार बच्चू कडू नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे अशी चर्चा रंगली आहे.

हे सगळं होत असताना अजित पवार आणि जयंत पाटलांनी शिंदे सरकार कोसळणार असा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. वेदांता प्रकल्प शिंदे सरकारच्या काळात राज्याबाहेर गेला. त्यासोबत दुसरे मोठे प्रकल्पही राज्याबाहेर जात असल्याचे दिसत आहे. जुलै महिन्यातलं पत्र दाखवत अजित पवारांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली होती.

तसेच अजित पवारांनी मंजूर केलेल्या सर्व कामांना चंद्रकांत पाटलांनी कात्री लावल्याने दोन्हीकडे वातावरण तापलेले आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनेक कामांना पुण्याच्या पालकमंत्र्यांकडून स्थगिती देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या
India : पाकिस्तानने हरवलं आफ्रिकेला पण वाट लागली भारताची; वर्ल्डकपमधून भारत बाहेर? 
Buldhana : पत्नीला कार शिकवणे शिक्षकाला पडले महागात, कार ७० फुट विहीरीत कोसळून दोघांचा मृत्यू
sharad koli : शिंदे सरकारचा ठाकरे गटाला दणका, शिवसेनेच्या ‘या’ आक्रमक नेत्याच्या भाषणावर घातली बंदी
Vaishali Suryavashi : खबरदार! यापुढे माझ्या वडीलांचा फोटो लावला तर…; शिंदेगटातील आमदारावर बहीण भडकली

 

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now