राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार त्यांच्या रोकठोक स्वभावासाठी नेहमीच चर्चेत असतात. त्यांचे अनेक किस्से असेही आहेत, की ते एखादी घटना घडली असेल तर त्याचा निकाल तिथेच लावून ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना न्याय मिळवून देत असतात.
रोकठोक स्वभावाचे पुन्हा एकदा दर्शन घडून आले आहे. राज्याच्या राजकारणात अजित पवार हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा आक्रमकपणा, रोखठोक विधान अनेकदा चर्चेचा विषय बनला आहे. नुकतंच साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहाच्या बांधकामावरून अजितदादांनी अधिकाऱ्यांना सुनावलं आहे.
साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहाचं उद्घाटन अजित दादांच्या हस्ते करण्यात आलं. अजित पवारांनी खोल्यांमध्ये बसवण्यात आलेले डबल बेड, भारंभार बसवण्यात आलेले लाईटचे स्पॉट पाहिले. आणि तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर बोलताना अजितदादांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापले.
‘शासकीय विश्रामगृहाचं उद्घाटन झालं. पण मला काही ते आवडलेलं नाही,’ अशा शब्दात अजितदादांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. “मी आता त्या बांधकामाची चौकशी लावणार आहे,” असं देखील अजित पवारांनी यावेळी बोलताना सांगितलं. यामुळे पुन्हा एकदा अजितदादांचा आक्रमकपणा अनुभवायला मिळाला.
दरम्यान, पुढे बोलताना अजित पवारांनी काही सवाल देखील उपस्थित केले. “कुठं फेडाल ही पापं? वर गेल्यानंतर तुम्हाला तर नरकातच जावं लागेल. नागरिकांनी म्हटलं पाहिजे की त्या सरकारच्या काळात हे काम चांगल झालं. नाहीतर आम्ही मुंबईला आमच्या घरी पोहोचेपर्यंत इथे तुटलेलं असायचं. काय त्याला करायचंय?, असे सवाल अजितदादांनी उपस्थित केले.
बऱ्याच अधिकाऱ्यांना वाटत असतं की ‘अजित पवार सारखेच दम देत असतात. चांगलं काम केल्यानंतर तुमचं कौतुकही करेन ना”, अशा शब्दांत अजित पवारांनी अधिकाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली. दरम्यान, आता अजित पवार खरच त्या बांधकामाची चौकशी लावणार का? हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
“होय माझे शरद पवार यांच्यासोबत चांगले संबंध आहेत आणि मला या गोष्टीचा गर्व आहे” – ब्रिजभूषण सिंग
बिग ब्रेकींग! खाजगी वाहनांना टोल कायमचा माफ होणार, ‘या’ सरकारने घेतला मोठा निर्णय
७५ पैशांचा शेअर गेला २ हजारावर; १ लाखाचे झाले २७ कोटी; ‘या’ शेअरचा बाजारात धुमाकूळ