Share

Ajit Pawar : अजित पवारांनीच सांगितलं कधी पडणार भाजप-शिंदेंचं सरकार, आकडेवारी देत केला खुलासा

devendra fadanvis ajit pawar

ajit pawar shocking statement on maharashtra government  | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आले आहे. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना घेऊन बंडखोरी केली होती. त्यानंतर शिवसेनेचे १२ खासदारही त्यांच्या गटात सामील झाले. पण हे नवीन सरकार किती महिने टिकेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तसेच या प्रश्नाला विरोधकांकडून उत्तरही दिले जात आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीच या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. इतकंच नाही, तर त्यांनी हे सरकार कधी पडेल हे आकडेवारी सांगत स्पष्ट केले आहे. तसेच योग्य वेळेची वाट पाहतोय, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे

१४५ बहुमतांचा आकडा आहे, तोपर्यंतच हे सरकार टिकणार आहे. मंत्रिपदावरुन शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे काही काळ थांबा सर्व समोर येईल. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड शिवसैनिकांना आवडलेले नाही, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

विधानसभेच्या २८८ जागा आहे. तर बहुमताचा आकडा १४५ इतका आहे. शिंदे गटाकडे ४० शिवसेना आणि १० अपक्ष आमदार आहेत. तर भाजपकडे स्वत:चे १०६ आमदार आहेत. तसेच त्यांना इतर ८ आमदारांचा पाठिंबाही आहे. त्यामुळे शिंदे-भाजप सरकारचे एकूण १६४ आमदार आहेत.

दुसरीकडे पाहता महाविकास आघाडीकडे एकूण १२२ आमदार आहेत. तसेच एमआयएमचे २ आमदार असून त्यांचा कोणालाही पाठिंबा नाहीये. पण आमदारांनी पुन्हा बंड केले तर हे सरकार पडू शकते. कारण मंत्रिपदाच्या वाटपामुळे काही आमदारांना मंत्रीपद मिळालेले नाही. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे.

शिंदे गटातील आमदार नाराज आहे, त्यामुळे पुन्हा सरकार पडू शकते, असे अजित पवार म्हणताना दिसत आहे. तसेच काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही असेच वक्तव्य केले होते. आमदारांना दिलेल्या आश्वासनामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारात अडचणी येत आहे. पण आमदारांना मंत्रिपद मिळत नसल्यामुळे ते नाराज असल्याचे दिसत आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या-
Marriege Essay : लहान मुलाने लग्नावर लिहिला भन्नाट निबंध, पाहून शिक्षीकेलाही फुटला घाम; म्हणाली, ‘तु मला येऊन भेट’
Rohit Sharma : रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला, ‘या’ खेळाडूने ४२ चेंडूत ठोकले नुसते चौकार आणि षटकार; केल्या २६८ धावा
Tukaram munde : २ मिनीटांत ब्लड टेस्ट! ‘त्या’ मशिनसाठी राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, तुकाराम मुंडेनीही लावली हजेरी

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now