निवडणूक बिनविरोध नाही, सगळा खेळ आता अपक्षांवर…; अजितदादांनी वाढवले शिवसेनेचे टेंशन

गेल्या काही दिवसांपासून राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात चर्चा सुरू आहे. शिवसेनेत प्रवेश करा उमेदवारी देतो अशी शिवसेनेने संभाजीराजेंपुढे अट ठेवत संभाजीराजेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.  मात्र त्यांनी ती मान्य न केल्याने संभाजीराजेंना डावलून शिवसेनेने संजय पवारांना ही राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.

त्यातच पुरस्कृत म्हणून महाविकास आघाडीने पाठबळ द्यावे, असा माजी खासदार संभाजीराजे यांचा प्रयत्न होता. मात्र शिवसेनेने नकार देत अनपेक्षितपणे शिवसेनेचे कोल्हापूरचे संपर्कप्रमुख संजय पवार यांचे नाव पुढे केले. संभाजीराजेंना शिवसेनेने डावल्यानंतर राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे.

‘संभाजीराजे शिवसेनेत आले असते तर त्यांना उमेदवारी मिळाली असती आणि ते निवडूनही आले असते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार नाही असा माझा अंदाज आहे,’ असं स्पष्ट राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी सांगितलं आहे.

ते याबाबत मुंबईत पत्रकरांशी बोलत होते. अजित पवार म्हणाले की, मागील काही दिवसांपूर्वी यासंदर्भात मी भाष्य केलं होतं. आमची मत आम्ही शिवसेनेला देणार असल्याचं स्पष्ट सांगितलं होतं. आमचा ४२ मतांचा कोटा आहे. त्यांच्याकडे २७ ते २८ मत असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

पुढे अजित पवार म्हणतात, ‘माझा अंदाज आहे की ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. निवडणूक होईल. पक्षाचे अधिकृत मतदार दाखवून मतदान केलं जातं. मला काल माहिती मिळाली आहे की अपक्षांना दाखवण्याचा अधिकार नाही,’ असं अजित पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.

दरम्यान, गुजरात मधील निवडणुकीचा दाखला देत अजितदादा सांगतात,’गुजरातमध्ये असं काही झालं तेव्हा ती मतं अवैध ठरली गेली. त्यामुळे अपक्षांनीही ज्या पक्षाचे सहयोगी असतील, त्यांना दाखवण्याचं काम केलं असतं, तर निवडणूक बिनविरोध झाली असती. मात्र आता सगळा खेळ अपक्षांवर असल्याच अजितदादांनी स्पष्टच सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या
कोणी केला संभाजीराजेंचा गेम? राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतल्याशिवाय उरला नाही दूसरा पर्याय
VIDEO: विराट प्रायवेट पार्टवर लावत होता एब्डोमिनल गार्ड, कॅमेरामॅनने शुट करून टाकली पुर्ण फिल्म
‘मला तुमची आठवण येते बाबा, तुम्हाला घट्ट मिठी मारायचीये’; विलासरावांच्या आठवणीने रितेशला अश्रु अनावर
IPL स्पर्धेतून बाहेर पडताच सुट्टी सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा, पत्नीसोबतचे रोमॅंटिक फोटो व्हायरल