Share

मुख्यमंत्र्यांनी पवारांकडे तक्रार केल्यानंतर अजितदादांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले “आम्ही एकटे…”

sharad pawar

भाजपला डावलून राज्यात तीन वेगळ्या पक्षानी मिळून स्थापन झालेले महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून सतत चर्चेत आहे. यातीलच एक मुद्दा म्हणजे ठाकरे सरकारमधील नाराजीनाट्य. एकाच सरकारमध्ये काम करत असले तरी अनेक नेते पक्षाला घरचा आहेर देत आहेत, तर अनेक नेते हे आपल्याच सरकारमधील पक्षावर टीका करत आहेत.

हे सांगण्याच कारण म्हणजे पुन्हा एकदा ठाकरे सरकारमधील अंतर्गत धुसफूस अलीकडे मोठ्या प्रमाणात चव्हाट्यावर आली आहे. शिवसेनेने थेट राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसवर तिखट शब्दात निशाणा साधत आहे. यामुळे सध्या ठाकरे सरकारमध्येच आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे.

असे असतानाच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आपली ही नाराजी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली आहे. शिवसेना भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेत असताना राष्ट्रवादी मात्र मवाळ भूमिका घेत असल्याचं उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना सांगितलं आहे.

यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर येत आहे. याबाबत ते मुंबई येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना मुख्यमंत्री ठाकरेंच्या नाराजीबद्दल विचारले. याबाबत बोलताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, “आम्ही एकटे काम करत नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधींनी मिळून ही महाविकास आघाडी तयार केली आहे. त्याबद्दल सर्व मिळून निर्णय घेतील. काम करताना एकमेकाला मदत कशी होईल हाच प्रयत्न असतो,” असे अजितदादांनी स्पष्टच सांगितले.

दरम्यान, “फक्त शिवसेनाच नाही तर राष्ट्रवादीच्या वतीनेही आम्हीच लढत आहोत. शिवसैनिक फ्रंटफूटवर जाऊन लढत असताना राष्ट्रवादी मात्र बॅकफूटवर दिसत आहे. ज्याप्रमाणे त्यांना भाजपाविरोधात भूमिका घेतली पाहिजे तशी घेताना ते दिसत नाहीत”, असे काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या एका बड्याने नेत्याने म्हंटले असून नाराजी व्यक्त केली होती.

महत्त्वाच्या बातम्या
फेसबुकची मैत्री भोवली; गायछापचा वारसदार भासवून लावला चुना, वाचा नेमकं प्रकरण काय?
‘शालेय अभ्यासक्रमात बदल करून भाजप मुलांच्या मनात विष पेरत आहे’ – शरद पवार
अबब! विसावलेल्या कोब्र्याला तरुणाने घातली अंघोळ, फिरवला डोक्यावरून हात; थरारक व्हिडिओ व्हायरल
करोडो घेऊन ‘या’ 8 खेळाडूंना भोपळाही फोडता नाही आला; यामध्ये 17 कोटी घेणाऱ्या प्लेअरचाही समावेश

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now