महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबईतील शिवाजी पार्क इथल्या गुढीपाडवा मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषण करत राष्ट्रवादीवर निशाणा साधला. शिवाजी पार्क इथे पार पडलेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी शरद पवारांवर टीका करताना, राज्यातील जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप केला.
1999 ला जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला, त्यानंतर जातीपातीचं राजकारण वाढलं, अस राज ठाकरे यांनी म्हंटले. राज ठाकरे म्हणाले, ‘राष्ट्रवादीचा जन्म होण्याआधी जात ही अभिमान होती. मात्र राष्ट्रवादीच्या जन्मानंतर यांनी दुसऱ्या जातीचा द्वेष करायला शिकवलं. आम्ही जातीतून बाहेर पडणार नाही, तर मग आम्ही हिंदू कधी होणार, असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांच्या या टीकेनंतर आता राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली होती.
त्या मुलाखतीची आठवण करून देत अजितदादा म्हणतात, ‘वाह रे पठ्ठ्या..जेव्हा तुम्ही शऱद पवारांची मुलाखत घेतली आणि तोंडभरुन कौतुक केले. त्यावेळी मुलाखत घेताना शरद पवार यांना जातीयवादी वाटले नाहीत आणि काही दिवसातच जातीयवादी वाटू लागले, असे अजित पवार म्हणाले.
‘अशा लोकांनी शरद पवारांवर टीका टिप्पणी करणं म्हणजे सूर्याकडे पाहून थुंकल्यासारखं आहे. राज ठाकरेंकडून ही अपेक्षा नव्हती, असेही अजित पवार म्हणाले. राज ठाकरेंना टीका आणि नकलांशिवाय काहीच जमत नाही, असे म्हणत अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली.
दरम्यान, एकदा राज ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं. एकेकाळी आपले निवडून आलेले १४ आमदार आपल्याला सोडून का गेले? नुसती भाषणं करून जनतेचा आणि रोजीरोटीचा प्रश्नही सुटत नाही, असे म्हणत अजितदादांनी राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला. राज ठाकरे खुप पलटी मारतात, असेही त्यांनी नमूद केले.
महत्त्वाच्या बातम्या
राज ठाकरेंच्या भाषणावर काहीही बोलू नका, MIM खासदार इम्तियाज जलील यांच्या कार्यकर्त्यांना सूचना; म्हणाले…
फक्त एका दिवसात मायलेकी कमवत होत्या १० हजार रुपये; कारण समोर आल्यानंतर पोलिसही चक्रावले
भारताच्या ‘या’ स्टेशनवर जाण्यासाठी लागतो व्हिसा; नियम पाळले नाही, तर थेट टाकतात तुरुंगात
मनसे मेळाव्यानंतर प्राजक्ता माळीची फेसबुक पोस्ट तुफान व्हायरल; “कोणत्याही राजकीय पक्षात…”